नाशिक : शेती वाचवा, शेतकरी वाचवा, सहकार वाचवा, देश वाचवा, हा नारा देत महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने आयोजित सहकार परिषद संपन्न झाली. यावेळी सहकार वाचविण्यासाठी व्यापक चळवळ उभारण्याचा ठराव एकमताने पारित करण्यात आला.
तसेच, यावेळी सहकार चळवळ चे ज्येष्ठ मार्गदर्शक विश्वास ठाकूर यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्ष स्थानिक किसान सभेचे राज्य सचिव राजू देसले होते. तसेच शेतकरी विकासाच्या वाटा या पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले. तसेच गोदावरी सहकारी बँक, नाशिक च्या चेअरमन अमृता पवार यांना ‘सहकार रत्न सन्मान’ ने गौरविण्यात आले.
हेही वाचा ! प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, असा करा अर्ज !
यावेळी कॉम्रेड नामदेव गावडे म्हणाले, गेल्या आठ महिने होऊन जास्त काळ दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत व शेतीमालाला आधारभूत किंमत मिळेल असा संसदेत कायदा करावा, या प्रमुख मागण्या आहेत. लाखोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला आहे. संपूर्ण देशभरातून शेतकऱ्यांनी या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी आंदोलने केली आहेत शेकडो शेतकरी आंदोलनात शहीद झाले आहेत. तरीही मोदी सरकारने हे आंदोलन सामंजस्याने संपवणे ऐवजी हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न चालवले असल्याचा आरोप गावडे यांनी केला.
परिषद मध्ये विविध कार्यकारी सोसायटी नाशिक जिल्हा फेडरेशन चे जिल्हा अद्यक्ष विष्णुपंत गायखे, हाऊसिंग फेडरेशन संदीप नगरकर, विका सोसायटी गट सचिव संघटना नेते विश्वनाथ निकम, यांनी आपल्या क्षेत्रातील सहकार चळवळ अडचणी मांडल्या. चर्चेत व्ही. डी. धनवटे, संपत वक्ते, प्रा. के. एन. अहिरे, प्रा. अशोक सोनवणे, पुंडलोक थेटे मार्गदर्शन केले आहेत. सूत्रसंचालन अँड दत्तात्रय गांगुर्डे यांनी केले. आभार भास्कर शिंदे यांनी मानले. याप्रसंगी स्वागत नामदेव बोराडे, किरण डावखर यांनी केले.
हेही पहा ! कृषी योजना एकाच छताखाली; ‘महाडीबीटी’ पोर्टलवरून घ्या लाभ, असा करा अर्ज !
या प्रसंगी राजाराम गायधनी, विष्णुपंत गायखे, शिवराम गायधनी, नामदेव बोराडे, किरण डावखर भास्कर शिंदे, सतीश कोठावळे, चंद्रभान कोंबडे, संदीप नगरकर, ज्ञानेश्वर तूपसुंदर, संपत थेटे, रामचंद्र टिळे, विठोबा धोत्रे, श्रीकृष्ण शिरोडे, के. एन. अहिरे, राजकुमार चव्हाण, सुनील मजुलकर, त्रंबक पारधी, बाजीराव धुळे, निवृत्ती कसबे, जयश्री आहेर, भास्कर लांडगे, विजय दराडे, भीमा पाटील, महादेव खुडे, विराज देवांग, अँड दत्ता निकम, विट्टल घुले, सोपान थोरात आदी उपस्थित होते.