चांदवड (सुनिल सोनवणे) : चांदवड येथे रेणुका मातेचा नवरात्र उत्सव सुरू असून देवीचे दर्शन घेऊन परतलेल्या भाविकाचा अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने मृत्यू झाला आहे.
चांदवड येथील राजेंद्र दशरथ बडोदे आणि शिवाजी सानप हे दोघे रेणुका मंदिर येथे देवीचे दर्शन करून घरी परतत असताना हॉटेल निकिता समोर त्यांच्या मोटर सायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने राजेंद्र बडोदे यांचा जागीच मृत्यू झाला व शिवाजी सानप यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले.
तीव्र उतार असल्या कारणाने घाटातून सर्वच गाड्या अतिवेगाने जातात त्यामुळे येथे अपघात होतात. या ठिकाणी (देवी मंदिर ते पेट्रोल पंप) या पर्यंत तीन ते चार ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकावेत अशी मागणी चांदवडच्या नागरिकांकडून होत आहे. स्पीड ब्रेकर टाकले तर अपघात कमी होतील व निरपराध लोकांचे बळी जाणार नाहीत अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.