Wednesday, February 5, 2025

पुणे : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा खून

पुणे, ता. १२ : पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात चौदा वर्षाच्या मुलीचा एकतर्फी प्रेमातून खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नात्यातील मुलानेच अल्पवयीन मुलीचा कोयता व चाकूने वार करून खून केला आहे. ही घटना एकतर्फी प्रेमातून झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी ओंकार उर्फ शुभम बाजीराव भागवत (वय २१, रा. चिंचवड) याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

खून झालेली मुलगी कबड्डीपट्टू असून ती आठवीत शिक्षण घेत होती. बिबवेवाडीतील यश लॉन्स परिसरात ती कबड्डीचा सराव करण्यासाठी येत असत. मंगळवारी सायंकाळी सराव करून मैत्रिणीसोबत घरी जात असताना ओंकार भागवतने त्या मुलीला बाजूला बोलावून घेतले. त्यावेळी एकतर्फी प्रेमातून त्यांच्यात वाद झाला, त्यातून त्याने मुलीवर कोयत्याने वार करून कोयते घटनास्थळी टाकून पळ काढला. पोलिसांनी संशयावरून दोघांना ताब्यात घेतले आहे तसेच इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

घटनास्थळी पोलिसांना सुरा, दोन तलवारी, कोयता, मिरची पावडर आणि खेळण्यातील पिस्तूलही सापडले आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles