Wednesday, February 12, 2025

आळंदीतील स्वच्छता जनजागृतीतून गाडगे बाबा पुण्यतिथी साजरी

आळंदी/अर्जुन मेदनकर: आळंदी नगरपरिषद आणि शहरातील विविध सेवाभावी संस्था, पदाधिकारी यांचे वतीने संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी स्वच्छ सर्व्हेक्षण ३.० , माझी वसुंधरा, स्वच्छ भारत अभियान उपक्रम राबवित स्वच्छता आणि जनजागृती करीत संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

      आळंदीतील संत लीलाभूमी असलेल्या आळंदी सिद्धबेट मध्ये प्रथम संत गाडगे बाबा महाराज यांचे पुण्यतिथी निमित्त संत गाडगे महाराज यांचे प्रतिमेची पूजा, पुष्पहार आणि पुष्पांजली अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी महर्षी वेदव्यास पाठशालेतील मार्गदर्शक मोरे काका यांचे हस्ते संत गाडगे बाबा यांचे प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. यावेळी ह. भ. प. माऊली दास महाराज, संयोजक आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, भाजपचे आळंदी संघटन सरचिटणीस भागवत काटकर, पोलीस वेल्फेअरचे कार्याध्यक्ष किरण कोल्हे, पुणे जिल्हा अध्यक्ष रवी धनवे, महा.राज्य यशवंत संघर्ष सेना अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे, दक्षता सेवा फाउंडेशन अध्यक्ष किरण नरके, ज्ञानेश्वर शेटे, ऍड सूर्यकांत चौधरी, प्रा. राजू गोटे, संघर्ष युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेव भोसले, उद्योजक उमेशशेठ रानवडे, आळंदी नगरपरिषद आरोग्य निरीक्षक हनुमंत लोखंडे यांचेसह शालेय मुले, नागरिक, भाविक उपस्थित होते.            

 संत गाडगे बाबा यांचे पुण्यतिथी निमित्त आळंदीतील विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती,वारकरी भाविक यांनी सिध्दबेटातील प्लास्टिक कचरा संकलन करीत आळंदी नगरपरिषद आरोग्य निरीक्षक हनुमंत लोखंडे यांचे कडे पुढील विल्हेवाटी साठी सुपूर्द करण्यात आला. यावेळी मौलिदास महाराज, नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर यांनी मार्गदर्शन करीत संत गाडगे महाराज यांच्या कार्यातून प्रेरणा घेत सामाजिक बांधिलकीतून स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याचे सांगितले. हे कार्य असेच पुढे नियमित सुरु ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. एक दिवसा पुरती स्वच्छता न राहता कायम स्वरूपी आपले गाव, परिसर स्वच्छ कसा राहील. यासाठी काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.आळंदी जनहित फाऊंडेशनसह विविध सेवाभावी संस्था यांचे माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यासाठी आळंदी स्वच्छता अभियानचे समन्वयक अर्जुन मेदनकर यांनी संयोजन केले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles