Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

बोराटे ग्रामपंचायत युवा सरपंच किरण सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय “आदर्श सरपंच” पुरस्कार जाहीर

---Advertisement---

कळवण (सुशिल कुवर) : बोराटे ता. बागलाण येथील ग्रामपंचायतचे युवा सरपंच किरण निंबा सूर्यवंशी यांना सर्च मराठी फौंडेशनच्या वतीने २०२१ चा राज्यस्तरीय “आदर्श सरपंच” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

---Advertisement---

स्थानिक स्वराज्य संस्थेची सगळ्यात महत्त्वाची फळी मानले जाते ती म्हणजे ग्रामपंचायत. अशाच ग्रामपंचायतीचा प्रमुख आणि गावचा आद्य नागरिक म्हणून कार्य करत असणाऱ्या सरपंचांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यभरातील निवडक सरपंच यांचा सर्च मराठी फौंडेशन व मीडिया समूहा तर्फे सन्मान करण्यात येणार आहे.

बोराटे ग्रामपंचायतीचे युवा सरपंच किरण सुर्यवंशी यांनी गावामध्ये विविध विकास कामे मार्गी लावत गाव आदर्श ग्राम च्या दिशेने घेऊन जाण्यास प्राधान्य दिलेलं आहे, तसेच करोना काळामध्ये लसीकरण जनजागृती, करोना लसीकरणाबद्दल लोकांमधील भीतीचे वातावरण दूर करून त्याबरोबर त्यांनी विशेष उपाययोजना राबवून करोनामध्ये अनोखा संघर्ष केला, गावामधील मोबाईल नेटवर्क समस्या, जिल्हा परिषद शाळा डिजिटलकरण, चिखल मुक्त गाव अभियान, गावातील प्रत्येक घरात वीज पुरवठा, पशुवैद्यकीय दवाखाना दुरुस्ती, गावात सिमेंटचे रस्ते, घरकुल योजना, जैतापूर ते हरणबारी रस्ता काम तसेच त्यांनी गावात १ लाख २१ हजार वृक्षारोपण अश्या अनेक कार्याला महत्त्व दिले असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत किरण सूर्यवंशी यांना “सर्च मराठी फौंडेशनच्या” वतीने यावर्षीचा २०२१ चा राज्यस्तरीय “आदर्श सरपंच” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार सोहळा सर्च मराठी फौंडेशन मार्फत दि. ३१ अक्टोबर रोजी पुणे येथे संपन्न होणार असून या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील पुरस्काराने सन्मानित झालेले सर्व ‘आदर्श सरपंच’ या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती सर्च मराठी फौंडेशनचे संचालक विजय वजार्डे यांनी दिली.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles