जुन्नर : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य देवराम लांडे यांचे वडील कै. सखाराम मारूती लांडे यांच्या पाचव्या पुण्यस्मरण निमित्ताने महाआरोग्य शिबीर व भजनाच्या स्पर्धा केवाडी येथे पार पडल्या.
यावेळी आदिवासी भागातील नागरीकांसाठी मोफत रोग निदान महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचे उद्घाटन जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके व जिल्हा परिषद पुणे मुख्य कार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदिवासी पश्चिम भागातील १,२०० रूग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला व १,००० कोव्हिड लसीकरणाचे डोस देखील देण्यात आले.
व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा.
तसेच, वारकरी बांधवांसाठी भजन स्पर्धेचे आयोजन केले होते, त्यावेळी ४२ भजनी भारूड मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी संपुर्ण केवाडी गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातुन देवराम लांडे यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत, परंतु या महाआरोग्य शिबीराचे आयोजन केल्याने नागरिक समाधानही व्यक्त करत आहेत.