Wednesday, March 12, 2025

मोदी सरकार देशामध्ये धर्म, जात, पंथाचे अर्थहीन राजकारण खेळत आहे – भालचंद्र कांगो

आकुर्डी येथील कामगार अधिवेशनात केंद्र सरकारवर टीका

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर :
ग्रीव्हज कॉटन एन्ड अलाईद कंपनीज एम्प्लोंईज युनियनची ७४ वी वार्षिक सर्व साधारण सभा दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ रोजी श्रमशक्ती भावन आकुर्डी पुणे येथे संपन्न झाली सभेच्या अध्याक्ष स्थानी डॉ भालचंद्र कांगो होते. सभे मध्ये सालाबाद प्रमाणे युनियानच्या २०२२ – २०२३ वर्षासाठी कार्यकारनीची निवड करण्यात आली यामध्ये कॉ. भालचंद्र कांगो यांची अध्यक्ष पदी तासेक कॉ माधवराव रोहम यांची युनियनच्या सरचिटणीस पदी पुन्हा निवड झाली तसेच एस. जी. सुळके उपाध्याक्ष टी. ए. खराडे, सहा सरचिटणीस एस. बी .चौधरी, डी. पी. गायधनी चिटणीस ( सेक्रेटरी ), ए.एम. गायकवाड (खजिनदार) पी. आर. चौधरी ( सहखजिनदार ), एन.आर.आकोटकर, के. एम. खाणका, एच एस. गोलांडे, ए. व्ही. इंगळे, एस. बी. शेलार, बी. बी. मांडे,आर. बी. जाधव, एम. एस. चौधरी, ए. एम. रोहम, के. एस. वालकर, शिवा शेट्टी याची युनियनच्या कार्यकारिणी कमिटी सदस्यपदी निवड करण्यात आली.

कॉ.भालचंद्र कांगो यांनी सभेत अध्यक्षीय भाषण केले त्यात ते म्हणाले की, देशामध्ये कामगार विरोधी कायदे बनवून देशातील कामगारांचे मुलभूत हक्क हेरावून घेतले आहेत. तसेच देशात कोरोनाच्या काळात मोदी सरकारने देशातील मुठभर भांडवलदारांच्या नफेखोरी साठी देशातील सार्वजनिक प्रकल्प त्यांना विकत आहेत. देशामध्ये धर्म,जात,प्रांत यांचे अर्थहीन राजकारण खेळून सामान्य जनतेला त्यांच्या मुलभूत गरजांपासून वंचित ठेवत आहे त्यामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.


देशातील केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कायदे मोडीत काढून देशातील शेती भांडवलदारांच्या फायद्यासाठी बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू देशातीला शेतकऱ्यांनी तो दिल्लीच्या सीमेवर रात्रंदिवस आठ महिने तीव्र धरणे आंदोलन करून हाणून पाडला या मध्ये शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्याच प्रमाणे आज देशातीला मोदी सरकार भांडवलदारांच्या मदतीने देशातील युवकाच्या बेरोजगारी, महागाई, सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी पैश्यांच्या जोरावर आमदार विकत घेऊन सरकार स्थापना करत आहे ही लोकशाहीला घातक अशी यंत्रणा आहे व यासारख्या राजकारणा मुळे देशातीला लोकशाही लोप पाउण देशात अराजक परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे पुढील काळात कामगार आणि शेतकर्यांची एकजूट देशातील सरकार हद्दपार करेल असे त्यांनी नमुद केले.


तसेच या वेळी एस. बी. चौधरी, टी. ए. खराडे, डी. पी. गायधनी यांनी सभेला मार्गदर्शन केले आणि सभेचे अभारप्रदर्शन डी. पी. गायधनी यांनी केले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
Lic

Lic

Related Articles

- Advertisement -

Latest Articles