Wednesday, February 5, 2025

ब्रेकिंग : अमरावतीमध्ये बंदला दुसऱ्या दिवशीही हिंसक वळण

अमरावती, ता.१३ : त्रिपुरा येथे अल्पसंख्याकांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. यावेळी जमावाने अनेक दुकानांची तोडफोड आणि दगड फेक केली होती.

या हिंसेच्या निषेधार्थ आज १३ नोव्हेंबर रोजी भाजपने अमरावती मध्ये बंद पुकारला होता, या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली आहे, मात्र या भाजपच्या बंदला आजही पुन्हा हिंसक वळण लागले आहे. या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान, अमरावती मध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज केला जात आहे. तसेच शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles