तांदूळवाडी ( वार्ताहर क्रांतिवीर रत्नदीप): यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव सन 2022 अंतर्गत तालुकास्तरीय विविध स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद तांदुळवाडी शाळेने घवघवीत यश संपादित केले आहे.
या स्पर्धेअंतर्गत तांदुळवाडी शाळेतील विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. आपल्या कला व क्रीडा शक्तीचे प्रदर्शन करून त्यांनी शाळेचे नाव तालुकास्तरावर नेले आहे.
यामधील निकाल पुढीलप्रमाणे :
उंच उडी लहान गट – सागर माने – प्रथम क्रमांक.
उंच उडी – प्रेम धाईंजे- तृतीय क्रमांक
गोळा फेक – प्रेम धाईंजे – प्रथम क्रमांक
थाळीफेक – प्रेम धाईंजे -प्रथम क्रमांक
लोकनृत्य छोटा गट – द्वितीय क्रमांक
या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थी,पालक,व मार्गदर्शक शिक्षकांचे महाराष्ट्र जनभूमी न्यूज नेटवर्क तर्फे अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !

