दिघी : पर्यावरण पूरक स्वच्छता संदेश देत सायकल रॅलीच्या माध्यमातून झाडे लावा , झाडे जगवा , पाणी आडवा , पाणी जिरवा , सायकल चालवा , इंधन वाचवा, आपली मुलगी सुरक्षित मुलगी आदी पर्यावरण निसर्गसंवर्धन जनजागृती व शरीर यष्टी साठी सायकल किती महत्त्वाची आहे या बाबत सायकल रॅलीतून जनजागृती करत तब्बल 176 कि.मी.चा यशस्वी सायकल प्रवास पूर्ण करण्यात आला.
या राॅली मध्ये माॅविक सायकल क्लबचे सायकल पटू दत्ता घुले, मयूर पिंगळे, निखिल बाबळे, तुषार वैरागे, प्रतिक जेले, प्रसाद वांगेकर, चंद्रकांत भिसे, सौरभ खोत, नचिकेत सहाणे, देवेंद्र सावंत आदी एकुण 10 सायकलपटू सहभागी झाले होते.
या पर्यावरण पूरक राॅलीला दिघीतून सुरुवात झाली तर पुढे मुंबई गेट आॅफ इंडियाला सायकल राॅली पूर्ण झाली.
या वेळी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने फिनीशअर सायकल पटूनां मिडल्स व प्रमाणपत्रक देण्यात आले.