मुंबई, ता.२७ : राज्य सरकारने करोना लसीकरण वाढवण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ज्यांचे कोव्हिडं लसीकरनाचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहे त्यांनाच सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे.
दक्षिण आफ्रिकेमध्ये करोनाचा नवा व्हेरिऐंट आढळला आहे. या व्हेरिऐंटमुळे केंद्र आणि राज्य सरकार हायअलर्टवर आहे. त्यामुळे राज्य सरकारने गंभीर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी झालेल्या बैठकी मध्ये मुंबईतील लोकलप्रमाणे एसटी, टॅक्सी, रिक्षा अशा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करायचा असेल तर दोन डोस घेतलेल्यांना परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
If default found inside taxi/pvt transport 4-wheeler or inside any bus, along with individual defaulting Covid appropriate behaviour being fined Rs 500; driver/helper/conductor shall be fined Rs 500; owner transport agency in cases of buses shall be fined Rs 1000:Maharashtra Govt pic.twitter.com/QX3q4YpT3V
— ANI (@ANI) November 27, 2021
तसेच राज्यात येणाऱ्या प्रवाशांनी ७२ तास आधीच RTPCR चाचणी टेस्टे देणे बंधनकारक आहेत. पण, सिनेमा हॉल, विवाह सोहळा, सभागृहात ५० टक्के लोकांनाच्या क्षमतेने उपस्थित राहवे. या ठिकाणी मास्क घातलेल्या नसल्यास ५०० रुपये दंड लागणार आहे. दुकांनामध्ये ग्राहकांनी मास्क न घातले तर दुकानदाराला १० हजार दंड वसूल करण्यात येणार आहे.