Wednesday, February 5, 2025

जुन्नर : अज्ञात चोरट्यांनी बँक आँफ महाराष्ट्रचे ATM मशीन फोडले

पिंपळवंडी : पिंपळवंडी (ता जुन्नर) येथे  सोमवारी (दि २९) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बँक आँफ महाराष्ट्रचे ए टी एम मशिन फोडले. मात्र या एटीएम मध्ये पैसे नसल्यामुळे या चोरट्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले यापूर्वीही एकदा याच बँकेचे एटीम मशिन चोरट्यांनी फोडले होते.

याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पिंपळवंडी उंब्रज रोड लगत बँक आँफ महाराष्ट्रची पिंपळवंडी येथील शाखा असून मागील मे महिन्यात अज्ञात चोरट्यांनी या बँकेचे एटीएम फोडले होते. मात्र त्यामध्ये पैसे नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेला सहा महिने होत नाहीत तोच पुन्हा सोमवारी ( दि. २९) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात  चोरट्यांनी एटीएम मशिन फोडले. मात्र या एटीएम मशीन मध्ये पैसे नसल्यामुळे चोरट्यांचा चोरी करण्याचा दुसरा प्रयत्नही फसला आहे. या अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी बँकेच्या बाहेर असलेले सीसीटीव्ही चोरट्यांनी फोडले.

याबाबतची फिर्याद बॅक आँफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक विशाल कल्याणराव म्हस्के रा. शुभम तारांगण सोसायटी कोल्हेमळा रोड नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिली असून या फिर्यादीवरुन आळेफाटा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे व आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांनी भेट देऊन पहाणी केली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles