Thursday, March 13, 2025

आम आदमी पार्टी आयोजित ‘आपला चषक २०२१’ मध्ये ६४ पैकी ४ संघांनी मारली बाजी

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टी आयोजित पिंपरी चिंचवड शहर स्तरीय आपला चषक 2021 प्लास्टिक बॉल अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड मनपा शाळेच्या मैदान येथे संपन्न झाल्या. ५ दिवस चाललेल्या या स्पर्धा मध्ये संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातून 64 संघांनी सहभाग घेतला होता. 

श्रीराम स्पोर्ट्स क्लब, रिस्की बॉईज, साई समर्थ प्रतिष्ठान, डिफेंन्डर स्पोर्ट्स क्लब या संघांनी प्रथम ४ बक्षिसे पटकावली. उत्कृष्ट फलंदाज शुभम गायकवाड, उत्कृष्ट गोलंदाज संदीप काळभोर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुरज पाटोळे, विशेष खेळाडू सचिन मोकाशी, विशेष सहभागी संघ ओम साई प्रतिष्ठान यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

बक्षिस वितरण समारंभास आम आदमी पार्टी प्रदेश संघटक विजयजी कुंभार, प्रदेश सचिव धनंजय शिंदे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख संदीप देसाई, पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद कीर्दत, संदीप सोनावणे यांच्या हस्ते सर्व टीमला गौरविण्यात आले.

आम आदमी पार्टी पिंपरी – चिंचवड कार्याध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे, ब्राह्मनंद जाधव, सुशील अजमेरा, नंदू नारंग, प्रज्ञेश शितोळे, सागर सोनावणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते अशी माहिती संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट यांनी दिली.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles