Monday, May 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : खासदार निधीतून काळेवाडीत रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू

पिंपरी चिंचवड : खासदार निधीतून काळेवाडीत रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू

पिंपरी चिंचवड : काळेवाडी प्रभाग क्रमांक 22 मधील अनेक वर्षांपासून रखडलेले होते. रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणच्या कामाला अखेर मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदार निधीतून आज (दि. १५ जानेवारी) शुभारंभ करण्यात आला. 

काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची मागील काही वर्षात अक्षरशः चाळण झालेली आहे. तसेच रहाटणी, थेरगाव, पिंपरी या आसपासच्या प्रभागात सिमेंट काँक्रिटचे रस्ते होत असताना काळेवाडीत मात्र रस्ते विकासाकडे दुर्लक्ष होत होते. साधे डांबरीकरणही नव्हते. मात्र या रस्त्यांच्या कामासाठी शिवसेनेचे उपशहरप्रमुख हरेश नखाते आणि विभागप्रमुख गोरख पाटील सातत्याने पाठपुरावा करीत होते. यासंदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडेही त्यांनी निधीची विनंती केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. 

हेही वाचा ! लेखी नोटीस दिल्याशिवाय विज मीटर कनेक्शन तोडू नये : आप

सदर खासदार निधीतून काळेवाडीतील ज्योतिबा नगर भागातील सूर्यकिरण कॉलनी, मातृछाया कॉलनी, समता कॉलनी या कॉलन्यांमधील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यावेळी स्थानिक रहिवाशांच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे, उपशहरप्रमुख हरेश नखाते आणि सुजाता नखाते यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी विभागप्रमुख गोरख पाटील, उपप्रभाग प्रमुख अनिल पालांडे, संघटक गणेश वायभट, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ, रहाटणी विभागप्रमुख प्रदीप दळवी, उपसंघटिका शारदा वाघमोडे, संगीता पवार, तसलीम शेख, मीनाक्षी वऱ्हाड, अरुणा माने, नलिनी शिंदे, हनुमंत पिसाळ, सुनील पालकर, अरुण हुमनाबादे, दत्ता गिरी, सावता महापुरे, दीपक पवार, नरसिंग माने, लक्ष्मण सुरवसे, बळीराम सातपुते, हेमंत शिंदे, राहुल शिर्के, नवनाथ कोकणे, सुमन कोकणे, कविता रेवते, सीमा वाघमारे, अस्मिता बरडे, दशरथ गुरव, महेंद्र वराड यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

– क्रांतिकुमार कडुलकर

हेही वाचा ! पिंपरी चिंचवड महानगर पालिका प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रकल्प पुन्हा गुंडाळणार का ?

हेही वाचा ! इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५७० जागा

हेही वाचा ! मेट्रो स्थानक परिसरात कामगारांचे शिल्प, उद्योगनगरी – कामगार नागरीचा इतिहास व प्रतिकृती, माहितीचे फलक लावा – कामगार नेते काशिनाथ नखाते

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय