दिंडोरी : दिंडोरी नगरपंचायतीच्या गटनेतेपदी भाजपच्या अरुणा रणजित देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी भाजप पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. नगरसेविका प्रज्ञा तुषार वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली अरुणा रणजित देशमुख यांची भाजप गटनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी गटनेते पदाची सूचना मांडली. नगरसेविका आशा कराटे यांनी अनुमोदन दिले.
10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी ! परीक्षेविना मिळेल रेल्वेत नोकरी, 2422 जागा; आजच अर्ज करा !
दिंडोरी नगरपंचायतीची नुकतीच निवडणूक पार पडली असून त्यात भाजपला 4 जागा मिळाल्या होत्या. सत्ता स्थापनेसाठी ते कुणाबरोबर गट स्थापन करतात. याकडे अवघ्या तालुक्याचे लक्ष लागले असताना भाजपने आपल्या चार जागेचे गट तयार करुन गटनेता जाहीर करण्याची आघाडी घेतली आहे.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, भाजप नेते चंद्रकांत राजे, माजी गट नेते प्रमोद देशमुख, विवेक कुलकर्णी, शिवाजी पिंगळ, तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, भास्कर कराटे, शहराध्यक्ष शाम मुरकूटे, निलेश गायकवाड, तुषार वाघमारे, काका देशमुख, रणजित देशमुख आदींनी अभिनंदन केले.
ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’