चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी येत्या 23 जानेवारीला संपूर्ण राज्यात संपूर्ण लॉकडाऊन असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेत संपुर्ण लाॅकडाऊन लावणारं तमिळनाडू हे पहिलं राज्य बनलं आहे. तमिळनाडूमध्ये सध्या 28 हजार नवीन रूग्ण आढळत असल्याचं दिसतंय.
तमिळनाडूमध्ये आज 28 हजार 561 कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे तर चेन्नईमध्ये 7 हजार 520 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे आता पर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या ही राज्यात 30 लाखांच्या पार गेली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची हिच संख्या लक्षात घेता राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी ! परीक्षेविना मिळेल रेल्वेत नोकरी, 2422 जागा; आजच अर्ज करा !
राज्यात शनिवार रविवार मेट्रोसह सार्वजनिक वाहतूक बंद राहणार आहे. लॉकडाउनचे निर्बंध मोडणाऱ्यावर अतिशय कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सरकारने दिला आहे. संपूर्ण राज्यात लॉकडाउन करणारे तामिळनाडू हे देशातील पहिले राज्य आहे.
सूर्या च्या जयभीम चित्रपटास ऑस्कर ?