जुन्नर : कोरोना प्रादुर्भावाने जुन्नर तालुक्यात आजअखेर ६९७ नागरिकांचा बळी गेला असून अनेक महिलांचे सौभाग्य या रोगाने हिरावून घेतले आहे. या एकल महिलांसाठी हळदी-कुंकूचा कार्यक्रम तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन बेलसर (ता. जुन्नर) येथील सावित्रीबाई फुले वृद्धाश्रम सेवा संस्था व रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीने केले होते.
याप्रसंगी डॉ. शितल शिंदे व डॉ. कल्याणी पुंडे यांनी कोरोना नंतरची जीवन पद्धती आणि ताणतणाव नियंत्रण या विषयावर मार्गदर्शन केले, अशी माहिती वृद्धाश्रमाच्या प्रमुख नंदाताई मंडलिक यांनी दिली. याप्रसंगी उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच डॉ. मोहन डोळे मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने उपस्थित महिलांच्या डोळ्याची तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक रुग्णांना पुढील शस्त्रक्रियेसाठी नारायणगाव येथे नेण्यात येणार असल्याची माहिती रवी कानडे व वृषाली डेरले यांनी दिली.
‘एसएफआय’ च्या वतीने महात्मा गांधी स्मृती दिनानिमित्त ‘स्वच्छता मोहीम’
दरम्यान कोरोना काळात घरातला कर्ता पुरुष गेल्यामुळे विविध जबाबदाऱ्या पार पाडताना महिलांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. या काळात त्यांना कायदेविषयक ज्ञान असणे, हे फार गरजेचे असते. त्याकरिता या एकल महिलांना ॲड. रत्ना हांडे व ॲड. रोहिणी गाडेकर यांनी शेती, मालमत्ता, महिला अत्याचार आदी २८ कलमांची सखोल माहिती दिली.
याप्रसंगी रोटरी अध्यक्ष हितेंद्र गांधी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उज्वला शेवाळे, सेजल गांधी, पल्लवी शाह, एफ. बी. आतार, सोमय्या विद्यापीठाच्या अर्पणा मंडलिक, शालिनी मंडलिक, कवी संदीप वाघुले, उदापुरच्या उपसरपंच डॉ. पुष्पलता शिंदे, संचिता रोकडे व परिसरातील महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी आयोजित हळदीकुंकू व तिळगुळ समारंभात महिलांना मास्क व सुगंधी तेल आदी संक्रांतीचे वाण देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लातूर येथील ॲड. बादाडे यांनी केले.
पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट करा LIC ची ‘ही’ पॉलिसी, रोज केवळ 30 रुपये जमा करा !
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा