मुंबई : सोमवारी राज्यातील अनेक ठिकाणी ऑफलाईन परिक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी दहावी बारावीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनात काही ठिकाणी हिंसा झाल्याचेही समोर आले.
दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या ऑफलाइन परीक्षा रद्द करुन ऑनलाइन पद्दतीने घ्याव्यात यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले होते. धारावीसह नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद येथे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते, यावेळी काही ठिकाणी तोडफोडदेखील करण्यात आली. या प्रकरणी आता विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला धारावी पोलिसांनी अटक केली आहे.
हिंदुस्थानी भाऊने सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर करून विद्यार्थ्यांना चिथावणी देण्याचे काम केले असल्याने विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला धारावी पोलिसांनी अटक केली आहे.
हिंदुस्थानी भाऊ नावाने सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या विकास पाठक यांनीच दहावी आणि बारावीच्या मुलांना आंदोलनासाठी चिथावणी दिली, असा त्यांच्यावर आरोप आहे.
हिंदुस्थानी भाऊ यांच्या व्हिडिओनंतर हे आंदोलन भडकल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आलं आहे.
हेही वाचा :
शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन हे योग्य नाही – गृहमंत्री वळसे पाटील
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती २०२१-२२ साठी महाडीबीटीवर अर्ज करण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ