नाशिक : शेतकरी- कामगार बेरोजगारांची निराशा करणारे बजेट आहे. या बजेटमध्ये महागाई वाढणार असून विषमता वाढेल, तसेच गरीब अधिक गरीब – श्रीमंत अधिक श्रीमंत होणार, अशी टिका भिकू कामगार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी केली आहे.
डॉ. कराड म्हणाले की, अर्थमंत्र्यांनी कार्पोरेट टॅक्स कमी करून भाजपाला देणग्या देणाऱ्या कार्पोरेटसना खूष केले आहे. त्याच वेळी सामान्य जनतेवर जीएसटी हा अन्यायकारक कर लावून त्यांची लूट सुरूच ठेवली आहे. या बजेटमुळे अबज्यापतींची संख्या 142 वरून 300 होईल. पण त्याच वेळी गरिबांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल. आर्थिक विषमता अधिक वाढणार आहे.
ब्रेकिंग : देशाचे अर्थसंकल्प सादर, अर्थसंकल्पाने जनतेला काय दिले वाचा एका क्लिकवर !
देशातील 5 कोटी बेरोजगारांना बजेटने काहीही दिलासा दिलेला नाही. 70 लाख रोजगार निर्माण करण्याची घोषणा फसवी ठरणार आहे. यापूर्वी भाजपाने दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा अनुभव जनता घेतच आहे. छोटे व लघुउद्योग मोठ्या संख्येने बंद पडून कामगार कर्मचारी बेरोजगार होत आहे. यावर बजेटमध्ये काहीही योजना जाहीर केली नाही. शेतकऱ्यांसाठी कुठलीही नवीन योजना नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी काहीही तरतूद नाही. शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती ( खते, बियाणे,कीटकनाशके) कमी करण्याबाबत काहीही उपाय नाही. तसेच शेती मालाला किमान किफायतशीर दर देण्याबाबत अर्थमंत्री विसरले आहेत, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना डॉ. कराड म्हणाले, देशात 10 लाखांपेक्षा जास्त सरकारी पदे रिक्त आहेत. त्याठिकाणी भरती करण्याचा सरकारने विचारही केला नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढणारच आहे. असंघटित क्षेत्रातील कामगार अंगणवाडी, आशा कर्मचारी यांना किमान वेतन किंवा कुठलीही सामाजिक सुरक्षा अर्थमंत्र्यांनी जाहीर केली नाही. महागाई कमी करण्याचा विषय अर्थमंत्र्यांच्या अजेंड्यावर दिसत नाही. त्यामुळे महागाई वाढतच जाणार आहे. रोजगार हमी योजना, किमान वेतनात वाढ, जुनी पेन्शन योजना या जनतेच्या मागण्यांची दखल ही बजेटमध्ये घेतली नाही.
केंद्रीय अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांची निराशाच केली – डॉ.अजित नवले
शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात सरकारी गुंतवणूक वाढविल्याशिवाय खाजगी क्षेत्राकडून होणारी लूट थांबविता येणार नाही. असे असूनही या क्षेत्रासाठी बजेटमध्ये हात आखडता घेतला आहे. एकंदरच बजेट मूठभर कार्पोरेटना खुश करण्यासाठी व फसव्या घोषणा करण्यासाठीच आहे. हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे, अशी टिका कराड यांनी केली.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये विविध पदांच्या ११४९ जागा! आजच अर्ज करा!
‘अंडे आधी की कोंबडी?’ संशोधकांनी शोधले उत्तर