Wednesday, February 5, 2025

जुन्नर : खूनाच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरारी आरोपीस पोलिसांनी केली अटक

जुन्नर : खुनाच्या गुन्ह्यातील १ वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला आळेफाटा पोलीसांनी अटक केली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आळे (ता.जुन्नर) या ठिकाणी दि.१० मार्च २०२१ रोजी मोहनसिंग ननहकसिंग (वय ४०) सध्या राहणार आणे ता. जुन्नर व मुळ गाव. मुरमा थाना मेदीनीनगर सतबरवा पलामु राज्य झारखंड याच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीने सिमेंटचा ब्लॉक ने मारहाण करून गंभीर जखमी करून ठार केले होते. याबाबत पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती.

10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! परिक्षेच्या सरावासाठी मिळणार Question Bank !

या गुन्ह्यातील तपास पोलीसांनी चालु केला असताना संशयित आरोपी सुधीर चंपावत जाधव (वय ३८) राहणार विळद जि.अहमदनगर मुळ गाव आरंडगाव ता.संगमनेर हा गुन्हा घडल्यापासून आळेफाटा परीसरातुन एक वर्षांपासून गायब झाला होता. त्याच्या गावी पोलिसांनी दहा ते बारा वेळा जाऊन तपास केला असता तो भेटला नव्हता. 

‘जुन्नर ते पुणे’ पीएमपीएमएल बससेवेचा पुढील आठवड्यात शुभारंभ

दरम्यान संशयित आरोपी हा अहमदनगर जिल्ह्यातील एम.आय.डी.सी या ठिकाणी लपून रहात असल्याची माहिती खब-यांकडून मिळाल्यानंतर पोलीसांनी वेषांतर करून जवळपास चार दिवस या ठिकाणी शोध घेतला असता आरोपी दारू पिण्यासाठी एम.आय.डी.सी. परीसरातील देशी दारूच्या दुकानावर आल्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असून या आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे.

ब्रेकिंग : पुणे जिल्ह्यातील शाळा “या” तारखे पासून पूर्णवेळ सूरू होणार

ही कामगिरी पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिलेल्या सूचनांनुसार पोलीस हवालदार विनोद गायकवाड, भिमा लोंढे, लहानु बांगर, अमित वाळुंजे यांनी केली आहे.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles