Friday, March 14, 2025

किरीट सोमय्या यांचा महापालिकेच्या पायरीवर सत्कार, “त्या” पायऱ्यांचे काँग्रेसकडून गोमुत्र, गुलाबपाण्याने शुद्धिकरण

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

पुणे : भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा महापालिका इमारतीच्या ज्या पायरीवर भाजप कार्यकर्त्यांनी सत्कार केला, ती पायरी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोमुत्र आणि गुलाबपाण्याने धुवून काढल्याने यावरून पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती

पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांना काही दिवसांपुर्वी शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती, त्यावेळी सोमय्या हे महापालिकेच्या पायऱ्यांवर पडले त्यात त्यांना इजा झाली होती. आज शुक्रवारी सोमय्या यांचा त्याच महापालिका इमारतीच्या पायरीवर भाजप कार्यकर्त्यांनी सत्कार केला. 

विशेष लेख : भारत स्वस्त मजुरांची अस्वस्थ बाजारपेठ

मात्र, ज्या पायऱ्यांवर सोमय्या यांचा सत्कार झाला त्या पायऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोमुत्र शिंपडून आणि गुलाबपाण्याने त्याचे शुद्धिकरण केले. या घटनेमुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.

Valentine’s week : जोडीदाराला खुश करण्यासाठी देऊ शकता या ५ भेट !

Related Articles

- Advertisement -

Latest Articles