Tuesday, April 30, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआम आदमी पार्टीतर्फे काळेवाडीत रक्तदान शिबिर संपन्न 

आम आदमी पार्टीतर्फे काळेवाडीत रक्तदान शिबिर संपन्न 

पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टीच्या चिंचवड विधानसभा समितीतर्फे काळेवाडीतील राजवाडा लॉन्स येथे आज दिनांक 3 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

संपूर्ण जगावर उडवलेल्या कोरोना संकटामुळे आरोग्य विषयी जागरूक झालेल्या नागरिकांनी शरीराला अपाय होईल या भीतीने रक्तदानाकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसत आहे, त्यामुळे शहरातील रक्त साठ्यांवर परिणाम होऊन मागणीच्या प्रमाणात पुरवठ्यावर मर्यादा येत आहेत, या प्रश्नाचे सामाजिक भान जपत आम आदमी पार्टी चिंचवड विधानसभेचे कार्याध्यक्ष यशवंत कांबळे यांच्या नेतृत्वात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे आप चिंचवड प्रवक्ता संजय मोरे यांनी सांगितले. 

शिबिराचे संयोजन आप पिंपरी चिंचवड विधानसभा च्या संपर्क प्रमुख संतोषी नायर आणि प्रचार प्रमुख शशिकांत कांबळे, शहर प्रशासकीय कार्यप्रमुख यल्लाप्पा वालदोर, शहर सामाजिक न्याय विभाग प्रमुख चंद्रमणी जावळे तसेच आप चिंचवडचे कार्यकर्ते अजय सिंग, महेश गायकवाड, मंगल सातकर, सरफराज मुल्ला आदींनी केले.

यावेळी प्राध्यापिका सीमा यादव यांनी आम आदमी पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला‌. विशेष म्हणजे रक्तदान करण्यासाठी आलेल्या रक्तदात्यांपैकी आकाश जाधव, गणेश राऊत, प्रदीप रणदिवे यांनी आम आदमी पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या रक्तदान शिबिरात 150 लोकांनी सहभाग नोंदवला त्यातील 43 व्यक्तीनी रक्तदान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय