Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने चाहत्यांसाठी दिली गुड न्युज

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. आता आलिया भटने चाहत्यांसाठी एक गुड न्युज दिली आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहूण्याचे आगमन होणार आहे.

---Advertisement---

अभिनेत्रीने आलिया भट्टने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो रुग्णालयातील असून या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर दिसत आहेत. हा फोटो शेअर करुन आलियानं त्याला, ‘आमचं बाळ लवकरच येत आहे’, असं कॅप्शन दिलं आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं 14 एप्रिल 2022 रोजी लग्नगाठ बांधली. मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीमध्ये रणबीर आणि आलियाचा लग्न सोहळा पार पडला.

दरम्यान, आलियाने हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी कमेंट्स करुन रणबीर आणि आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये करण जोहर, मौनी रॉय, रकुलप्रीत सिंह, परिणिती चोप्रा, टायगर श्रॉफ आणि प्रियांका चोप्रा या सेलिब्रिटींनी देखील कमेंट्स करुन रणबीर आणि आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles