मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर 20 जूनला शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडल्यानंतर राज ठाकरे यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या हीप बोनवर ही शस्त्रक्रिया झाली.
राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते घरी गेल्याची माहिती त्यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. यानंतर राज ठाकरे यांना लवकर बरे होण्यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्वीट केले आहे. आव्हाड यांचे हे ट्वीट सध्या चांगलेच चर्चेत आहे.
आव्हाड यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे आपल्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. आपण बरे होऊन घरी परतलात. लवकरात लवकर आपण बरे व्हाल, ही आई भवानीकडं प्रार्थना. मी कोरोनात असताना माझ्या कन्येकडं आपण आस्थेने विचारपूस केली होती. हे मी विसरलो नाही. राजकारणात (politics) वाद असावेत द्वेष नाही.