नांदेड : आरोग्य विभागाचा कणा म्हणून आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांची भूमिका असून केंद्र व राज्य सरकार मागील अनेक वर्षापासून आशा वर्कर यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असून आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांना शासकीय योजनेत समाविष्ट करण्यासह त्यांचे विविध प्रश्न शासन दरबारी संघटनेच्यावतीने मार्गी लावू , असे प्रतिपादन सिटू संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष कॉ.उज्वला पडलवार यांनी केले.
दि. १९ रोजी रोजी देगलूर येथे आशा व गट प्रवर्तक फेडरेशनचे दुसरे तालुका अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनाच्या खुल्या सत्राचे अध्यक्ष सिटू संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षा काॅ. उज्वला पडलवार या होत्या तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष काॅ शिलाताई ठाकूर यांची उपस्थिती होती.
देशातील सर्वात तरूण महापौर करणार आमदारासोबत लग्नं
कृषि योजना : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
या अधिवेशानाचे उद्धघाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आकाश देशमुख यांनी केले तर या अधिवेशनाला शुभेच्छा देण्यासाठी बीसीएम पंढरीनाथ कांबळे यांची उपस्थिती होती.
अधिवेशनाची सुरवात शिक्षणाची कुळवाडी भूषण छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले व अधिवेशनाची सुरवात करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारने सर्व कामगार कायदे मोडीत काढून त्याचे रूपांतर 4 कायद्यात केल्याने कामगार देशोधडीला लागला आहे. त्यामुळं कामगारांच्या मध्ये खूप मोठा रोष निर्माण झाल्याने 28, 29 मार्च 2022 देशव्यापी संपामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला.
RBI मध्ये 950 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा!
यावेळी आशा व गटप्रवर्तकांची नवीन देगलूर तालुका कमिटी गठित करण्यात आली. या कमिटीच्या देगलूर तालुका अध्यक्षपदी गौरबाई विभूते तर सचिवपदी अनिता वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्षपदी सुनिता शेवाळे, उपाध्यक्षपदी विजया सिंगाडे, महानंदा बिरादार, पंचफूला सोनकांबळे, सहसचिव पदी वंदना कांबळे, रेखा गोरनाळे, रंजना जाधव कोषध्यक्ष पदी अम्रपाली माटापूरकर आदींची नविन तालुका कार्यकरणी निवडण्यात आली.