रत्नागिरी : दिनांक 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती चे औचित्य साधून रत्नागिरीतील शिवप्रेमींनी श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर रत्नागिरी नगरपालिका शाळा क्र. 19 आंबेशेत येथे शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप केले.
कार्यक्रमाची सुरवात मुख्याध्यापक भगवान मोटे यांनी शिव प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केली. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी छत्रपतींबद्दल आपले विचार व्यक्त केले. नंतर सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
विशेष लेख : शिवाजी महाराज आज असते तर !
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार
त्यावेळी शिवप्रेमी प्रथमेश साळवी,प्रसाद परवडी, प्रसाद कशेळकर, सिध्दराज सावंत, राजकिरण डोंगरे, उपस्थित होते. तसेच शिवप्रेमी कैलास देसाई, मंदार बने, सचिन सावेकर, निलेश डोंगरे, करूणेश इंदुलकर, अभि घोडके यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी मदत केली.
शिक्षक कांबळे व.म्हादे मॅडम यांनी महाराजांच्या जीवनाविषयी मुलांना माहीती दिली. त्यापैकी उत्कृष्ट सादरीकरण करण्याऱ्या कु. जाई प्रमोद सावंत ( इ. 7 वी ) हिला प्रसाद परवडी यांच्या वतीने रोख 101 रूपये चे पारितोषिक देण्यात आले.
हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या ५८ विद्यार्थिनी निलंबित
संजय दत्तच्या ‘तुलसीदास जुनियर’चा ट्रेलर रिलिज, दोन तासात तीन लाखांपार लोकांची पसंती!
तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने घेण्यात आलेल्या समूहगान स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या उच्च प्राथमिक गटातील वेदीका भाटकर, वैष्णवी कदम, हर्षदा वाडेकर, वैदेही कुर्टे यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक भगवान मोटे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये शिवाजी महाराजांबद्दल मुलांना सखोल माहीती दिली. आभार प्रदर्शन म्हादे मॅडम यांनी केले.