Friday, March 14, 2025

“विद्यार्थी आपले भविष्य आहेत त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करा” जयंत पाटील यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

मुंबई : रशिया आणि यूक्रेनमधील वाद दिवसेंदिवस वाढ आहे. कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची परिस्थिती आहे. अशात १८ हजार भारतीय यूक्रेनमध्ये अडकले आहेत, त्यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे त्यांना मदत करण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे.

रशिया आणि यूक्रेनमधील युध्दजन्य परिस्थितीत अडकलेल्या भारतीयांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदींना हाक दिली आहे. जयंत पाटील यांनी ट्वीट करून म्हंटले आहे कि, “रशिया आणि युक्रेन सीमेवरील परिस्थिती गेल्या १५ दिवसांपासून चिघळत चालली आहे. याठिकाणी सुमारे १८ हजार भारतीय आहेत, त्यापैकी बहुतेक युक्रेनमधील विद्यार्थी आहेत, ते मदतीची वाट पाहत आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की, विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत. ते आपले भविष्य आहेत.”, असे ट्वीट जयंत पाटील यांनी केले आहे.

सावधान ! युक्रेनवर कधीही हल्ला होऊ शकतो : ज्यो बायडेन

हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या ५८ विद्यार्थिनी निलंबित

दरम्यान, युक्रेनच्या लष्कराने युद्ध सुरू झाले असल्याचे पत्रक काढून नागरीकांना सतर्क करत युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने घराबाहेर पडू नका असे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवरच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ५३५ जागा!

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध पदांच्या एकूण १५३ जागा!

Related Articles

- Advertisement -

Latest Articles