Friday, December 27, 2024
Homeजुन्नरभिवाडे बुद्रुक येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत नाला बांध बंदिस्ती च्या कामास सुरुवात

भिवाडे बुद्रुक येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत नाला बांध बंदिस्ती च्या कामास सुरुवात

किसान सभेच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर जुन्नर प्रशासनाचे सकारात्मक पाऊल

जुन्नर : भिवाडे बुद्रुक (ता.जुन्नर) येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत नाला बांध बंदिस्ती च्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. किसान सभेच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर जुन्नर प्रशासनाने सकारात्मक पाऊल टाकत कामे हाती घेतली आहे.

भिवाडे बुद्रुक या आदिवासी गावामधील मजुरांना रोजगारासाठी नेहमी स्थलांतर करावे लागते. चार महिने शेतीची कामे संपल्यावर या गावातील मजुर मजुरीसाठी बाहेरगावी स्थलांतरित होत असतात. गाव सोडून जाण्याची मजुरांची इच्छा नसतानाही कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी त्यांना बाहेरगावी जावे लागते. किसान सभेच्या जनजागृती मोहिमेनंतर मजुरांनी गावातच काम मिळावे यासाठी ग्रामपंचायत कडे मागणी नोंदविली होती. काम मागणी नोंदविल्यानंतर १५ दिवसांच्या आत काम देणे कायद्याने बंधनकारक असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. मागणी केलेल्या गावामध्ये तातडीने कामे चालु करण्याची मागणी किसान सभेने वारंवार प्रशासनाकडे केली. 

जुन्नर : रोजगार मिळाला आता बेरोजगार भत्त्यासाठी लढा देणार, निमगिरीतील महिलांचा मजूरांचा निर्धार !

पुणे : जुन्नरला सातवाहन कालीन मातीच्या भांड्याचे अवशेष आढळले

सातत्याने बैठका, सभा, निदर्शने, मोर्चे झाले परंतु प्रशासन याकडे दुर्लक्षच करत होते. म्हणून दिनांक २ मार्च २०२२ पासून किसान सभा मजुरांसोबत काम मिळेपर्यंत आणि बेरोजगार भत्ता मिळेपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे पत्र २१ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रशासनाला दिले. यामुळे प्रशासनाने ताबडतोब भिवाडे बुद्रुक गावामध्ये एल. बी. एस ची कामे सुरु केली. या वेळी किसान सभेने प्रशासनाचे आभार मानले असले तरी बेरोजगार भत्ता मजुरांना मिळेपर्यत लढा सुरु ठेवत असल्याचा निर्णय घेतला आहे. 

या वेळी वनविभाग जुन्नरचे वनरक्षक निलेश विरणक, किसान सभा जुन्नर तालुका सचिव लक्ष्मण जोशी, वन धन योजनेचे राजेंद्र शेळके, रोजगार सेवक तुषार विरणक, तानाजी विरणक, जालिंदर सुपे, राजेंद्र लांडे, गुणाजी विरणक, साहेबराव विरणक, मुकेश गवळी, भगवान विरणक, चंद्रकांत भालचिम, श्रीराम‌‌ विरणक, राघुजी विरणक, कुसुमबाई विरणक आदींसह मजुर उपस्थित होते.

जुन्नर : श्री शिव छत्रपती महाविद्यालयात रंगले काव्य संमेलन

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये ११४९ जागांसाठी भरती, १२ वी पास विद्यार्थ्यांना संधी !

विशेष लेख : अमृतलाही पैजा जिंकायला लावणारी मराठी भाषा!


संबंधित लेख

लोकप्रिय