नांदेड : खासदार छत्रपती संभाजी राजे दि.26 फेब्रुवारी 2022 रोजी पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आझाद मैदान मुंबई आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्या उपोषणाला सकल मराठा समाज मुखेड तर्फे या निवेदनाच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीराजे यांचे प्रकृती खालावली, उपोषण सुरूच
महाराष्ट्र राज्य सरकार छत्रपती संभाजी राजांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी उपोषणाची दखल नाही घेतल्यास सकल मराठा समाज मुखेड हा एक दिवसाचे लक्षणीय उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य !
यावेळी सदाशिव जाधव, रामेश्वर इंगोले, सचिन इंगोले, रामदास जाधव, गोविंद डुमने, डॉ.रणजित काळे, श्रीकांत इंगोले, गिरिधर केरुरकर, गोविंद जाधव, मकदुम पठाण, बालाजी वडजे, आकाश केरुरकर, वैभव पा.वडजे , संभाजी आटाळकर, महेश बंडे, योगेश हिवराळे हे उपस्थित होते.