DYFI Junnar : डेमोक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) जुन्नर तालुका समितीचे पहिले अधिवेशन प्रभाकर संझगिरी स्मृती भवन येथे उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनाचे उदघाटन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉ.गणपत घोडे यांनी केले तर मा.डॉ. महारुद्र डाके जन आरोग्य मंच पुणे यांनी युवक चळवळी पुढील आव्हाने व संघटना बांधणी यावर मार्गदर्शन केले.
यावेळी अखिल भारतीय किसान सभा जुन्नर तालुका सचिव कॉ.लक्ष्मण जोशी, अनिस तालुका समन्वयक शिंदे, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच जुन्नर प्रा.संजय साबळे, एस.एफ.आय राज्य सचिवमंडळ सदस्य संदीप मरभळ, एस.एफ.आय जुन्नर तालुका सचिव सुरज बांबळे, शिक्षक समितीचे नेते नारायण मराडे यांनी उदघाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
अधिवेशनामध्ये तालुक्यामधील सामाजिक, राजकीय व बेरोजगारी बद्दलची परिस्थिती काय आहे याबाबतची सविस्तर मांडणी करण्यात आली. त्याच सोबत बेरोजगारी बद्दलचा लढा तीव्र करा, अन्याय अत्याचार विरोधी लढा तीव्र करा, सरकारी योजनांच्या बद्दलचा लढा तीव्र करा असे चार प्रकारचे ठराव अधिवेशनामध्ये मंडण्यात आले. सभागृहातील ४१ प्रतिनिधीनी आपला उल्लेखनिय सहभाग दर्शवून वरील ठराव एकमताने पारित करून तीव्र लढ्याची हाक दिली.
DYFI Junnar | १७ लोकांची तालुका समितीत एकमताने निवड
या पहिल्या अधिवेशनांनी १७ लोकांची तालुका समिती एकमताने निवडून दिली. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून कृष्णा दुधवडे तर सचिव म्हणून राजेंद्र शेळके, कोषध्यक्ष किरण हिले त्याच सोबत उपाध्यक्ष पदी शिवाजी लोखंडे, दिलीप कोकणे, सहसचिव पदी अनिल शेळके, स्वप्नील जाधव तर तालुका समिती सदस्य पदी रोहन जाधव, किरण दाते, सचिन साबळे, मंगेश बोऱ्हाडे, रवी मरभळ, रामदास जोशी, मनोहर कारभळ, मोहन घुटे, राजू शेळकंदे, स्वाती लोखंडे यांची निवड करण्यात आली.
शेवटी अनिसचे शिंदे यांनी प्रबोधनपर गीत गायले त्याच सोबत शिवाजी लोखंडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.