पिंपरी चिंचवड – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार महाराष्ट्राचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. (PCMC)
प्रमुख पाहुणे- रविराज इळवे यांनी उपस्थित कामगार तसेच पालक यांना संबोधित करतांना म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच्या हक्कांचे रक्षण केले आहे. १९४६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत नवीन विधेयक सुचवले होते जे कामगारांना त्यांच्या कामाच्या जागेत, कामाच्या तासांच्या संदर्भात द्यावयाच्या किमान वेतनाशी संबंधित होते.हे विधेयक १९४८चा कायदा बनला आहे आणि त्याला सध्या किमान वेतन कायदा, १९४८ असे संबोधले जाते. (PCMC)
कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे म्हणाले की जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर, एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या
कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल.असे कल्याण आयुक्त रविराज इळवे म्हणाले.
आण्णा जोगदंड म्हणाले कि,दिन दलितांच्या हक्कासाठी शिका ,संघटित व्हा आणि संघर्ष करा असा महामंत्र देणाऱ्या भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थतज्ञ, समाजसुधारक, न्यायशास्त्रज्ञ, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते, तर भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे आणि
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
ज्येष्ठ साहित्यिक व गुणवंत कामगार सुरेश कुंक यांनी कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या कामगार कल्याण आयुक्ता समोर यावेळी मांडल्या त्यांनी काही समस्यांचे निरसन केले आणि काही समस्या कामगाराच्या आहेत त्यांचा पाठपुरावा शासनाकडे करणार असल्याचे कल्याण आयुक्त यांनी सांगितले.
केंद्र प्रमुख प्रदिप बोरसे यांनी कामगारासाठी प्रसारित होणारे मासिक यांची सभासद होण्याचे आवाहन केले. सर्व योजनाची उपस्थितांना माहिती दिली. (PCMC)
या प्रसंगी प्रसंगी गुणवंत कामगार व सामाजिक कार्यकर्ते व गुणवंत कामगार अण्णा जोगदंड, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, शिवराज शिंदे, शंकर नानेकर, संतोष गोफणे, कैलास पाटील तसेच पोलीस कर्मचारी महादेव सुरवसे, पो,काँ.दिपाली वरुटे इत्यादी मान्यवर व परिसरातील रहिवासी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख प्रदिप बोरसे यांनी केले. कार्यक्रमाकरिता मनोज पाटील सहाय्यक कल्याण आयुक्त यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे संयोजन माया कदम, शंकर शेलार, भास्कर मुंढे, रुपाली मुळीक, यांनी केले. तर अश्विनी दहितुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.