पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पवार कुटुंबातील नातेसंबंध आणि राजकीय मतभेद चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पिंपरी-चिंचवड येथील विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात बोलताना एक महत्त्वाचे वक्तव्य केले. “मी शरद पवारांना (Sharad Pawar) कालही दैवत मानत होतो, आजही मानतो” असे म्हणत अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
बुधवारी पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा नागरी सत्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात अजित पवार यांनी शरद पवारांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. मी शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही दैवत मानतो, पण तळ्यात मळ्यात भूमिका घेतल्यास निर्णय घेता येत नाहीत, असं विधान अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. (हेही वाचा – मोठी बातमी : मनसे पक्षाची मान्यता रद्द होणार ? राज ठाकरे विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका)
२०२३ मध्ये अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसपासून वेगळे होत महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्हही त्यांच्या गटाला मिळाले. (हेही वाचा – मला प्रेमात अडकवून लग्न करण्यासाठी 20 कोटींची सुपारी)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०२३ मध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबातही दरी निर्माण झाली. अजित पवार यांनी महायुतीत सामील होत उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले, तर शरद पवार यांनी आपला गट ‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)’ म्हणून पुढे नेला. या फुटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले. आता अजित पवार यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. (हेही वाचा – महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटातील दृश्यावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप)