Friday, March 14, 2025

धक्कादायक : विरारमध्ये बारावी बोर्डाच्या उत्तरपत्रिका जळून खाक

HSC Answer Sheets Burnt in Virar : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) इयत्ता बारावीच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या असताना, विद्यार्थ्यांचे निकाल लवकर जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, याच दरम्यान, मुंबईजवळील विरार (Virar) येथे परीक्षेतील काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

एका महिला शिक्षकाने उत्तरपत्रिका तपासणीसाठी आपल्या घरी आणल्या होत्या. मात्र, त्यांच्या राहत्या घराला अचानक आग लागल्याने घरातील अन्य वस्तूंसह उत्तरपत्रिकाही जळून खाक झाल्या. विरार पश्चिम येथील गंगुबाई अपार्टमेंट, बोलींज नानभाट रोड, आगाशी परिसरात ही घटना घडली. आग नेमकी कशामुळे लागली, याची स्पष्ट माहिती समोर आलेली नसली तरी प्राथमिक तपासणीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

HSC Answer Sheets | उत्तरपत्रिका आगीत जळल्या

दरम्यान, सदर महिला शिक्षक आपल्या घरातील सदस्यांसह बाहेर गेल्या होत्या. त्याच वेळी घराला आग लागली आणि उत्तरपत्रिका आगीत जळून गेल्या. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर शिक्षण मंडळ आणि संबंधित महाविद्यालय प्रशासनाने याची दखल घेतली आहे. मात्र, सदर शिक्षक कोणत्या महाविद्यालयात कार्यरत होत्या, त्यांच्या जवळ किती उत्तरपत्रिका होत्या आणि त्या कोणत्या शाखेच्या होत्या, यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो धावत्या एसटी बसमध्ये पेपर तपासत असल्याचे दिसून आले होते. अशा घटनांमुळे शिक्षण मंडळाच्या कार्यपद्धतीवर आणि उत्तरपत्रिका तपासणीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

हे ही वाचा :

शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस जारी, वाचा काय आहे प्रकरण !

संतापजनक : मद्यधुंद तरुणाचे सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य, व्हिडिओ व्हायरल

राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, केला मोठा खूलासा

Related Articles

- Advertisement -

Latest Articles