Friday, March 14, 2025

PCMC : मंत्री नितेश राणे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करा – छावाची मागणी

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र राज्याचे एक कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे मागील काही दिवसापासून वारंवार समाजामध्ये जातीय तणाव व धार्मिक विद्वेष निर्माण करणारी वक्तव्य जाणीवपूर्वक करत आहेत. भारतीय संविधानाची शपथ घेऊन लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असताना अशी वक्तव्य करणे हे असंविधानिक आणि गुन्हेगारी कृत्य आहे.नुकतेच त्यांनी हिंदू मुस्लिमा मध्ये तणाव निर्माण करण्यासाठी “हलाल मटन व झटका मटण” या संदर्भात बोलत असताना हिंदू लोकांनी फक्त हिंदू मटन विक्रेत्याकडूनच मटन खरेदी करावे तसेच फक्त हिंदू व्यावसायिकांनाच मल्हार सर्टिफिकेशन देण्यात येईल असे जाहीर केले असून हे संविधान विरोधी आहे. (PCMC)

त्याचबरोबर त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात कोणीही मुसलमान नव्हते इतिहासकारांनी खोटा इतिहास लिहिला आहे. शिवाजी महाराजांची लढाई ही हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीच होती असे वक्तव्य करून राणे यांनी मंत्रीपदावर अर्थात संविधानिक पदावर असताना लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 125 अन्वये जाती-जातीत, धर्माधर्मात,दोन वेगळ्या जाती समूहामध्ये भांडण लावणे, तेढ निर्माण करणे अशा स्वरूपाचा गुन्हा केला आहे.

ज्यामुळे अशा वक्तव्याने भविष्यात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होईल व ते पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. त्यामुळे वरील कायदा व त्याच्या पोट कलमान्वये नितेश राणे यांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा, असे पिंपरी चिंचवड पोलीस अप्पर आयुक्त यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली. (PCMC)

तसेच या मागणीचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री मा.देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री मा.अजित पवार आणि मा.एकनाथ शिंदे तसेच राज्यपाल यांना दिले. राणे त्वरित कारवाई करा, अन्यथा महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी व लोकशाही तसेच संविधान प्रेमी जनतेच्या वतीने नितेश राणे व राज्य सरकारच्या विरुद्ध तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा छावा संघटनेसह इतर पुरोगामी संघटनांच्या वतीने यावेळी देण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वराज्य अभियान चे अध्यक्ष मानव कांबळे, छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी केळकर पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष वैभव जाधव, प्रदेश उपाध्यक्ष राजन नायर, प्रदेश संपर्कप्रमुख गणेश सरकटे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विष्णू बिरादार, इस्माईल शेख, महिला शहराध्यक्ष निशा जाधव काळे, शहर उपाध्यक्ष रावसाहेब गंगाधरे,सतीश नायर व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles