पिंपरी चिंचवड – महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा महिला दिनाचे औचित्य साधून गणेनगर ज्येष्ठ नागरिक संघ थेरगावच्या वतीने सामाजिक, राजकीय, क्रीडा, वैद्यकीय, पत्रकारिता, मानवी हक्क, सांप्रदायिक, क्षेत्रातील 10 कर्तुत्ववान रणरागिणी महिलांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. (PCMC)
यामध्ये मायात बारणे( राजकीय) करिश्मा बारणे (समाजसेविका )जयश्री श्रीखंडे, (साहित्य) कुमुदिनी घोडके, (कीर्तनकार) कु.आशा साळवे (पत्रकारिता) वृषाली मरळ (जेष्ट नागरिक), संगीता जोगदंड (मानवी हक्क) डॉ. निकि पारगे (वैद्यकीय) कु, श्रावणी घाडगे (क्रीडा) सुप्रियाताई पारगे.
(दामिनी पथक) या 10 रणरागिनीना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
महिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आत्मविश्वासाने व धाडसाने कार्यरत आहेत तसं पाहिलं तर खुरपणीपासून ते नासापर्यंत, देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत महिला कार्यरत आहेत. (PCMC)
आज आपल्या देशाचे जागतिक पातळीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जगभर प्रतिनिधित्व करत आहेत हे विसरून चालणार नाही. असे गौरव उदगार कार्यमाच्या अध्यक्षा माया बारणे यांनी केले .
प्रमुख पाहुण्यां करिश्मा बारणे त्या म्हणाल्या की, प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत तर महिलांच्या खंबीरपणे पाठीशी पुरुष उभे राहिलेले आपणास पाहावयास मिळतात याचा आम्हालाही सार्थ अभिमान आहे.
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विष्णुपंत तांदळे म्हणाले की महिला म्हटलं कि प्रेम, वात्सल्य ,स्नेह, ममता या भावना समोर येतात. स्त्री ही ती एक आई असते, ती ताई असते, ती मुलगी असते, ती बहीण असते, ती सासू असते, ती आजी असते, विविध वेगवेगवेगळ्या भुमिका बजावत असते पण त्याआधी ती एक असते नारी. तिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, त्या विश्व शक्तीचे नाव आहे नारी, म्हणूनच त्यांचा समाजाला दिशा, स्फुर्ती देणाऱ्या,महीलाचा सन्मान केल्याने आम्हाला ही आनंद झाल्याचे विष्णुपंत तांदळे यांनी सांगितले.
पुरस्काराला उत्तर देताना दामिनी पथकाच्या सुप्रिया पारसे म्हणाल्या की भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक, शिक्षण तज्ञ, कवयित्री आणि अस्पर्श मुलींना शिकवण्यासाठी त्यांनी जे ऐतिहासिक महान कार्ये केले आणि उदात्त मानवतावादी विचारांच्या असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना स्मरून आम्हा सावित्रीच्या लेकीचा सन्मान केला हे आमचे भाग्य आहे.
महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ यांनी म्हटले कि नेहमीच आपल्या देशाने स्त्रीला “समाजाचे परिपूर्ण शिल्पकार म्हणून मानले आहे”, पुरुषापेक्षा महिलाचे पदवीधराचे प्रमाण 43 टक्के अधिक आहे .146 राष्ट्रांमध्ये नोकरीत पण पुरुषापेक्षा अधिक महिला सक्षमपणे काम करताना दिसतात.
सा.का.आण्णा जोगदंड म्हणाले कि एल.अँड टी.चे अध्यक्ष एस.एन.सुब्रमण्यम यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे महिन्यातून एक दिवस महिलांसाठी पगारी सुट्टी मासिक पाळीच्या वेळी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. चीन,इंडोनेशिया,फिलिपाईन,दक्षिण कोरिया, तैवान, स्पेन, झांबिया या देशात एक ते तीन दिवसाची सुट्टी महिलांसाठी मासिक पाळीच्या दिलेली आहे ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
ज्येष्ठ नागरिक महिला सावित्री फुले, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या वेगवेगळ्या वेशभूषा धारण करून त्यांची माहिती देताना पहावयास मिळाली. (PCMC)
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा माया बारणे, प्रमुख पाहुण्यां करिष्मा बारणे, गणेश नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विष्णुपंत तांदळे, सा.का.आण्णा जोगदंड, करिश्मा,बारणे, जयश्रीताई श्रीखंडे, कुमुदिनी घोडके कु.आशा साळवी, वृषालीताई मरळ, संगीता जोगदंड, डॉ. निकिता पारगे, कु, श्रावणी घाडगे, सुप्रिया पारगे. गुणवंत कामगार शंकर नाणेकर, गणेश विपट, प्रमोद वाळणकर, तात्याबा तोरसे, नामदेव शेकोकर, नागनाथ तोडकरी, रमेश रासेकर, कुमुदिनी घोडके ईत्यादी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागनाथ तोडकरी, कृष्णा कळसकर, राजेंद्र परदेशी यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयश्री श्रीखंडे, गणेश विपटयांनी केले तर आभार गणेश नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विष्णुपंत तांदळे यांनी मानले.
PCMC : गणेशनगर जेष्ठ नागरीक संघ थेरगावच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून सावित्रीच्या लेकीचे पुरस्कार देऊन सन्मान
- Advertisement -