पिंपरी चिंचवड – आज आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवतेजनगर, चिंचवड येथे श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आणि मातोश्री आरोग्यधाम यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. (PCMC)
संधिवात, हाडांचे आजार, स्पॉन्डीलिसिस, रक्तदाब, मधुमेह, त्वचारोग, लठ्ठपणा इ इत्यादी आजाराचे निदान व मार्गदर्शन करण्यात आले.

आरोग्य शिबिराचे उद्घाटन महिला मंडळाचे अध्यक्षा स्नेहा गुणवंत, कार्याध्यक्षा सारिका रिकामे, सेवेकरी प्रमुख क्षमा काळे हस्ते करण्यात आले. (PCMC)
या प्रसंगी उपाध्यक्षा अंजली देव, स्मिता सिरसाठ, मनीषा देव, शोभा नलगे इ उपस्थित होते. मातोश्री आरोग्यधाम संस्थेच्या वतीने डॉ. के एस बामणे, डॉ. उमेश दुधगावकर, डॉ. एस आर गायत्री, डॉ. योगेश्री चव्हाण इ. डॉक्टरांनी तपासणी करून निदान केले. शिबिराला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी बडे यांनी केले.