Wednesday, March 12, 2025

PCMC : जप्त साहित्य परत मिळण्यासाठी आंदोलन

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका ड क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या सामान्य विक्रेत्यांवर कारवाई करून विक्रीचे कपडे, साहित्य, फळे, भाजी विक्रेत्यांचे टेम्पो सह इतर साहित्य जप्त करण्यात आले, ते नाशवंत माल खराब झाला आणि जप्त वस्तू परत दिले जात नाहीत म्हणून आज फेरीवाल्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन गेट समोर आंदोलन केले. (PCMC)

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ तर्फे केलेल्या आंदोलनात महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, शहर पथ विक्रेता समिती सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर, अलका रोकडे, किसान भोसले, सलीम डांगे, निमंत्रक अविनाश ब्याडगिरे, सुनील भोसले, पवन मानकरे, मंगेश सावरकर, मुझमिल काझी, सोमनाथ नांदूरकर, देविदास शिंदे, रवी गडदरे, प्रवीण दबे, गणेश सुरवसे, विनायक मुळे, कृष्णा वाघमारे, सोहेल शेख, मोहम्मद रिजवान, पूजा लोखंडे, अनंत गलांडे, दिनेश कांबळे आदी उपस्थित होते. (PCMC)


महानगरपालिका चुकीच्या पद्धतीने कारवाई करत असून जप्त साहित्य न देऊन एक प्रकारे भीती घालून व्यवसायापासून दूर करण्याचा प्रयत्न नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येतो आहे हे अत्यंत चुकीचे असून फेरीवाला कायद्याचे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. दीड ते दोन महिन्यापासून या विक्रेत्यांना व्यवसाय करताना त्रास देण्यात येत आहे.

टेम्पो चालक यांनी हप्त्यावरती गाड्या घेतलेल्या असून त्यांचे कर्ज कसे फेडावे असा प्रश्न आहे. वाकड, डांगे चौक,काळेवाडी,रहाटणी परिसरामध्ये कारवाई मोठ्या प्रमाणात असून त्यांना च्या कारवाईमुळे त्यांना कसे जगावे हा प्रश्न निर्माण झाला असून याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यास लवकरच बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles