Wednesday, March 12, 2025

करिअर व रोजगार मेळाव्यांचे आयोजन, मुलाखत आणि नियुक्ती पत्र देण्यात येणार

मुंबई : मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अशा दोन्ही जिल्ह्यांकरिता प्रादेशिक विद्या प्राधिकरण कार्यालयामार्फत ६ मार्च, २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत करिअर मार्गदर्शन आणि रोजगार मेळावा (Job fair) विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, विद्यालंकार मार्ग वडाळा, (पू.) मुंबई-३७ येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबईच्या प्राचार्य मनिषा पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

या मेळाव्यात इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थांना त्यांच्या आवडी-निवडी, क्षमता, व्यक्तिमत्व, वैशिष्ट्ये याबाबत जाणीव निर्माण करण्यासंदर्भात समुपदेशकांमार्फत समुपदेहान (करिअर टॉक) देण्यात येणार आहे. तसेच वय वर्ष १८ पूर्ण झालेल्या युवकांसाठी करिअर व रोजगार मेळाव्यांचे (Job fair) आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थी व पालकांना करिअर मार्गदर्शन आणि वय वर्ष १८ पूर्ण झालेल्या युवकांसाठी जिल्ह्यातील नियोक्त्यामार्फत व्यवसाय नियुक्ती संदर्भात विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे (Interview) आयोजन व प्रत्यक्ष स्थळी नियुक्ती पत्र (Appointment Letter) देण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

नोकरीच्या संधी शोधा :

IDBI बँके अंतर्गत 650 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत 705 पदांसाठी भरती

युनियन बँक अंतर्गत तब्बल 2691 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

बँक ऑफ बडोदा अंतर्गत तब्बल 4000 पदांसाठी भरती

भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 1194 जागांसाठी भरती

मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत ‘कनिष्ठ सहकारी’ पदांसाठी भरती

DFCCIL अंतर्गत विविध पदांच्या 642 जागांसाठी भरती

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 115 जागांसाठी भरती

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 1124 पदांची भरती

गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत पदांसाठी भरती

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ अंतर्गत भरती, पात्रता – 7 वी पास

Related Articles

- Advertisement -

Latest Articles