Wednesday, March 12, 2025

PCMC : महाराजांचा गनिमी कावा संकटावर मात करण्यासाठी मार्गदर्शक – श्रीनिवास हिंगे

एसबीपीआयएम मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा (PCMC)

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – रामायण, महाभारत या प्राचीन ग्रंथांमधील घटनांमधून आपल्याला व्यवस्थापन, नियोजन, नीती, समाजकारण, राजकारण याविषयी मार्गदर्शन मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आपल्याला अडचणीच्या काळात संकटावर मात करण्यासाठी मार्गदर्शक आहे. जिजाऊ मासाहेब, येसूबाई, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी यांचे पराक्रमी चरित्र आजच्या काळातील तरुण पिढीने समजून घेऊन आपले करिअर घडवण्यासाठी त्यातून प्रेरणा घ्यावी असे मार्गदर्शन श्रीनिवास हिंगे यांनी केले. (PCMC)

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून हिंगे यांचे व्याख्यान आणि लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर, ग्रंथपाल स्वाती सातपुते, अनघा कुलकर्णी, डॉ. रुपाली कुदरे, डॉ. योगेंद्र देवकर, डॉ. अमरीश पद्मा आदी उपस्थित होते. सूत्र संचालन सृष्टी कोमटे तर आभार अंकिता इचगुडे यांनी मानले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना वार्षिक स्नेहसंमेलनात पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. डॉ. रुपाली कुदरे, डॉ. योगेंद्र देवकर, डॉ. अमरीश पद्मा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. (PCMC)

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे उद्योजक उद्योजक नरेंद्र लांडगे व अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles