पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पिंपरी-चिंचवड माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) आणि आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. (PCMC)
या सोहळ्यात पिंपरी, चिंचवड व भोसरी परिसरातील सुमारे 90 हुन अधिक शाळा सहभागी झाल्या असून मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. श्रीपाल सबनीस (अध्यक्ष, ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) आणि मा. श्री. डॉ. भास्कर कारेकर (शिक्षणाधिकारी, माध्यमिक पुणे जिल्हा परिषद) यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी संगीता बांगर (घोडेकर) (प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ, पिं. चिं. मनपा), विजयकुमार ठोसर (सहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग, पिंपरी-चिंचवड मनपा), आणि हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. (PCMC)
याशिवाय, प्रसाद गायकवाड (सचिव, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ), नंदकुमार सागर (अध्यक्ष, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ व सचिव, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघ) हे प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन संभाजी पडवळ (अध्यक्ष पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ) सुबोध गलांडे (सचिव, पिंपरी-चिंचवड मुख्याध्यापक संघ) आणि यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक ॲड. महेश लोहारे, (संचालक) व. दैविक मंठाळे (सहसंचालक, आय आयबी करियर इन्स्टिट्यूट हेही उपस्थित होते.
शिक्षकांचे आभार व समाजासाठी त्यांचे योगदान
शिक्षक हा समाज घडवणारा आधारस्तंभ असतो आणि त्यांचे योगदान अपरिमित आहे. त्यांच्या सन्मानाने त्यांच्यात नवीन ऊर्जा संचारेल आणि शिक्षण क्षेत्रात अधिक गुणात्मक सुधारणा घडतील, असा विश्वास डॉ. श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केला.
“आज सरकार जे काम करत नाही ते आयआयबी इन्स्टिट्यूट करत आहे”. डॉ श्रीपाल सबनीस , “पुढे बोललेवर सरकार सोबत एक पाऊल पुढे टाकत डॉक्टर आणि इंजिनिअर बनवण्याचं समांतर कार्य आयआयबी इन्स्टिट्यूट करत आहे.” त्यानंतर आयोजक ॲड. महेश लोहारे, (संचालक, आयआयबी करियर इन्स्टिटयूट) ह्यांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. (PCMC)
डॉ. कारेकर “अशा उपक्रमांमुळे शिक्षकांच्या योगदानाला योग्य तो सन्मान मिळतो आणि शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याला प्रोत्साहन मिळते. आयआयबी करियर इन्स्टिटयूट आणि मुख्याध्यापक संघ त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे निश्चितच कौतुक करावे लागेल, कारण ते समाजात शिक्षकांविषयी आदर वाढवण्यास मदत करते”
डॉ. श्रीपाल सबनीस सरांचा अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा
कार्यक्रमाची सांगता डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या वर्षानिमित्त त्यांचा वाढदिवस साजरा करून करण्यात आली. उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक परिवारासाठी आयआयबी करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक, ॲड. महेश लोहार यांनी विशेष स्कॉलरशिप जाहीर केली.
या स्कॉलरशिपमुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी स्वतःच्या शिक्षणात व कौशल्यविकासात अधिक पुढे जाण्यास मदत होईल, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
PCMC : उपक्रमशील शाळा, गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निगडीत सन्मान
- Advertisement -