Friday, February 21, 2025

PCMC : चिंचवडच्या राजाचा ‘श्रीगणेश जयंती महोत्सव’ मोठ्या उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पिंपरी चिंचवड शहरात प्रसिद्ध असलेल्या चिंचवडचा राजा श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ आयोजित ‘श्रीगणेश जयंती महोत्सव २०२५’ अतिशय चांगल्या अशा धार्मिक वातावरणात संपन्न झाला. (PCMC)

याप्रसंगी श्रीगणेश जयंती निमित्त मंडळाच्या वतीने अध्यात्मिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या सदगुरु गंगागिरी महाराज संस्थानचे महंत व हिंदू श्रद्धास्थान रामगिरी महाराज यांची मिरवणूक व मंडळाचे सर्व आजी माजी अध्यक्ष अध्यक्ष व व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्या आमदार उमा खापरे, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे विश्वस्त ह.भ.प. माणिक महाराज मोरे, मार्तंड देवस्थान जेजुरीचे अध्यक्ष अनिल सौंदाडे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त देवराज डहाळे, मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त पांडुरंग थोरवे, न्यासी महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान पुणेप्रमुख वेदमूर्ती महेश नंदे गुरुजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्मजागरणचे संतोष गायकवाड, बजरंग दलाचे पुणे विभाग संयोजक कुणाल साठे, विश्व हिंदू परिषदेचे पुणे जिल्हामंत्री धनंजय गावडे, पतंजली योग समितीचे अजित जगताप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शार्दुल पेंढारकर, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सावंत, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड कार्यकारी शहराध्यक्ष माजी नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे, पालिका गटनेते राहुलदादा कलाटे, माजी नगरसेवक विजय शिंदे, उद्योजक धनेश धाडीवाल, बाळासाहेब लोंढे, चिंचवड पोलिस ठाणेचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी, गुन्हे निरीक्षक दिलीप गोसावी, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, भाजपा प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, ओबीसी आघाडीचे सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर, चित्रकार अनुपम मुकेरकर, सामाजिक कार्यकर्ते हेमंत डांगे, अमर गावडे, योगेश चिंचवडे आदी मान्यवर उपस्थित होते. (PCMC)

आदरणीय महंत रामगिरीजी महाराज यांच्या मिरवणूक प्रसंगी व सत्कारावेळी चिंचवडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यादरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदाही मंडळाने श्रीगणेश जयंतीनिमित्त सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रम व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

महोत्सवात प्रामुख्याने वेदमूर्ती श्री संजय शालिग्राम गुरुजी यांच्या हस्ते श्री गणेश याग यज्ञ हा धार्मिक विधी संपन्न झाला.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश माजी संघटन महामंत्री व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ क्षेत्रीय पूर्व प्रचारक रवींद्र भुसारी यांनी सकाळी महोत्सवाला हजेरी लावत चिंचवडच्या राजा चे मनोभावे दर्शन घेतले.

दिवसभर रक्तदान शिबीर, डोळे तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप हे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

श्री मोरेश्वर भदे व मयुरी भदे यांचा भावगीते व भक्तिगीतांचा कार्यक्रम व जोगेश्वरी भवानी मंडळ यांची भजने आणि त्याचबरोबर भजनांसाठी सुप्रसिद्ध असलेले स्व.गुरूवैर्य बाळासाहेब परदेशी ग्रुप पुणे, श्री साई नवनाथ भजनी मंडळ व साईभक्त गजेंद्र परदेशी सहकारी पुणे यांचा भजन संध्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या भव्य अशा श्री गणेश जयंती महोत्सवाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष श्री विठ्ठल सायकर, मंडळाचे कायदेशीर सल्लागार व माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, मंडळाचे कार्याध्यक्ष महेश मिरजकर यांनी केले व हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी अविनाश तिकोने, प्रमोदशेठ बारडिया, ॲड. सुनील होनराव, सतीश देशमुख, अजय परदेशी, आदित्य मिरजकर, राजेश शिरोळे, हर्षल मिरजकर, दुर्गेश मिरजकर, श्रेयस सायकर, यश बारडिया, योगेश मिरजकर, अजिंक्य राऊत, साहिल मिरजकर, विशाल गावडे, प्रसाद संगमनेरकर, तेजस तिकोने, अमित मुथा, मंगेश मिरजकर, मयूर लुंकड, दिनेश मोरे, प्रवीण भोकरे, रोहन जाधव, धनंजय शालिग्राम, ऋषिकेश मचाले, अक्षय जाधव, सचिन बारमुख, निखिल लोंढे या सर्वांनी कष्ट घेतले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles