पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – वीरशैव धर्मात जैनांची अहिंसा, बौद्धांची समता, ख्रिसतांची करुणा, द्रविडांची भक्ती, निष्ठा, ज्ञान, भक्ती असे गुणधर्म सामावलेले आहे. आमच्या वीरशैव धर्माची महानता सांगतांना इतर धर्माचे देखील आम्ही पावित्र्य जपतो.असे उदगार माजी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी काढले. (PCMC)
हिंदू वीरशैव लिंगायत मंचच्या वतीने चिखली येथे आयोजित करण्यात आलेल्या ३ ऱ्या वीरशैव समाज महा मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी डॉ. अभिनव चन्नमलेश्वर शिवाचार्य महास्वामी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, एटीएसएस कॉलेजचे प्राचार्य डॉ. विश्वास स्वामी, अभिषेक विद्यालयाचे अध्यक्ष
गुरुराज चरंतीमठ, पंचांप्पा मेनसे, सामाजिक कार्यकर्ते विकास साने, गणेश मळेकर, नारायण बहिरवडे, महादू नेवाळे, हिंदू वीरशैव लिंगायत मंचाचे अध्यक्ष, आयोजक सतीश पाटील, गणेश पाटील, आकाश पाटील, मंगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी पुढे म्हणाले कि, हाताचे पाच बोटे हे सारखे नसले तरी ते जेवणाचा खास घेताना मात्र पाचही बोटे एकत्रित येऊन मुखात जातात. त्या बोटांप्रमाणे वीरशैव समाजात विविध जाती,- धर्म आहे. पण सामाजिक कार्यात विरशैव समाजाने मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र आले पाहिजेत. (PCMC)
डॉ. अभिनव महास्वामी यांनी संगत सज्जना सोबत केली तर फळ चांगले मिळेल. जीवनात अध्यात्म किती महत्वाचे आहे या विषयावर कन्नड भाषेत मार्गदर्शन केले.
माजी कुलगुरू डॉ स्वामी म्हणाले कि, ज्ञानासारखी पवित्र गोष्ट दुसरी कुठलीही नाही. भौतिक ज्ञानासोबतच अध्यात्मिक ज्ञान असणे गरजेचे आहे. आपण गुरूंची आठवण ठेवली पाहिजेत. असे मत व्यक्त केले.
सतिश पाटील म्हणाले कि, लिंगायत समाजातील विखूरलेल्या नागरिकांना एकत्रित आणून त्यांना एकसंघ करणे, त्यांची उन्नती साधने, प्रत्येक घटकांचा विकास व्हावा यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले होते. आज समाजाला महास्वामीजींचे आशिर्वाद प्राप्तीसाठी हा आशिर्वचन ठेवले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू जाधव यांनी तर आभार सुनील शेवाळे यांनी मानले.
कार्यक्रम चंद्रशेखर पाटील, इरान्ना पाटील, सुरेश पाटील, राजू पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
PCMC : वीरशैव लिंगायत समाजाचा मेळावा उत्साहात संपन्न
- Advertisement -