Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Pune : पुनर्वसनासाठी मोबोज कंपाऊंड रहिवाशी व व्यावसायिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन

पुणे (क्रांतीकुमार कडुलकर) – सि. सं. नंबर 17, फायनल प्लॉट नंबर 246, बंड गार्डन रोड पुणे, या सरकारी जमिनीचे गैरव्यवहार करून चुकीच्या पद्धतीने दस्त नोंदणी तसेच अनेक वर्षे या जागेवर राहत असलेले व व्यवसाय करीत असलेल्या नागरिकांना बेकायदेशीरपणे अतिक्रमण कारवाया करून अन्याय केल्याच्या निषेधार्थ व बाधितांचे पुनर्वसन करावे या प्रमुख मागण्यासाठी मोबोज कंपाउंड रहिवाशी व व्यावसायिक यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयवर तीव्र निदर्शने करून आक्रोश आंदोलन करण्यात आले. (Pune)

सि. सं. नंबर 17, फायनल प्लॉट नंबर 246, बंडगार्डन रोड पुणे या सरकारी मिळकतीमध्ये रहिवासी लोक सत्तर वर्षे पेक्षा अधिक व व्यावसायिक 40 वर्षापासून वास्तव्यास असून या सर्व लोकांना पुणे शहर तहसीलदार व या सरकारी जमिनीच्या भूखंडाचा गैर व्यवहार करणारी व इतर इसमानी न्यायालयाची व शासनाची कोणती परवानगी नसताना भ्रष्ट मार्गाने खरेदी-विक्रीचे दस्त सरकारी सर दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात नोंदवले आहे.

---Advertisement---

ही बाब आम्ही लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी व पुणे शहर तहसीलदार यांना वारंवार सांगून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून आम्हा व्यावसायिक यांना दिनांक 11/7/2024 रोजी अतिक्रमण कारवाई करून उध्वस्त केले आहे. तसेच रहिवाशी न्यायिक मागणी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे कोणते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे आमचा कोणत्याही प्रकारे पुनर्वसनाचा विचार करत नाहीत.

सदर सरकारी जागेच्या बेकायदेशीर व्यवहाराची सखोल चौकशी करावी व झालेले आर्थिक गैरव्यवहार तसेच सरकारी जागेवर केलेले बेकायदेशीर गुंतागुंतीचे व्यवहार रद्द करण्यात यावे व यांच्यावर तसेच शासकीय अधिकाराचा गैरवापर केल्याने पुणे शहर तहसीलदार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी समिती नेमावी हे प्रकरण अतिशय गंभीर बाब असून मोमोज हॉटेल कंपाउंड मधील रहिवासी व व्यावसायिक यांचे या जागेमध्ये पुनर्वसन करावे अशी मागणी यावेळी आंदोलनाचे समन्वयक शैलेंद्र मोरे यांनी केली. (Pune)

या आंदोलनाचे नेतृत्व शैलेंद्र मोरे, दीपक गायकवाड, श्रीनाथ कांबळे, सत्यवान गायकवाड, अमोल तुजारे, अजीज शेख, सविधा गायकवाड, जिलेखा खान, माऊली भोसले, आशुतोष भोसले, अशोक पानसरे यांनी केले.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles