Wednesday, February 12, 2025

PCMC : दिल्लीकरांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदीवरचा विश्वास कायम ठेवून कौल दिला – आमदार अमित गोरखे

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – नुकत्याच झालेल्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिल्लीतील जनतेने लोकसभेप्रमाणेच भारतीय जनता पार्टी व मोदींवर विश्वास ठेवून एकतर्फी कौल दिला असून केजरीवाल यांच्या सत्तेला हादरा दिला आहे. (PCMC)

दिल्ली मधील प्रदूषणापासून ते पाणीपुरवठ्यापर्यंतचे अनेक प्रश्न केजरीवाल सरकारला हाताळता आलेले नाहीत, त्याचबरोबर अनेक विकासाची कामेही त्यांनी रखडवलेली जनतेने पाहिली आहेत.

त्यांनी जनतेला दिलेली अनेक आश्वासन ही आश्वासनच राहिली मात्र ते भ्रष्टाचारात स्वतः गुरफटले गेले असल्याने जनतेने हा कौल दिलेला आहे. हा विजय जनतेचा आहे, पंतप्रधान मोदी यांचेवर दाखवलेल्या विश्वासाचा आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles