पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक स्व. बाबुरावजी घोलप स्मृती सप्ताह निमित्त वाणिज्य विभागांतर्गत पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांसाठी “मुलाखतीचे तंत्र व देहबोली” या विषयावर डॉ. प्रज्ञा कुलकर्णी यांच्या विशेष व्याख्यान आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. (PCMC)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्य व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. वंदना पिंपळे, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. नरसिंग गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपप्राचार्या व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. वंदना पिंपळे यांनी मुलाखत देताना येणाऱ्या आव्हानांना कसे सामोरे जावे याबद्दल विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
“मुलाखतीचे तंत्र आणि देहबोली” या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्याख्याते डॉ. प्रज्ञा कुलकर्णी यांनी आपली देहबोली ही नैसर्गिक असावी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच देहबोलीचे विविध प्रकार त्यांनी स्पष्ट केले. (PCMC)
महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमृता इनामदार पाहुण्यांची ओळख प्रा. प्रवीण खाडे तर आभार प्रदर्शन डॉ. नरसिंग गिरी यांनी केले
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागातील प्रा. सुषमा सोनार डॉ. रश्मी भुयान, डॉ. मनीषा त्र्यंबके, प्रा. अरबाज सय्यद, प्रणित पावले यांनी परिश्रम घेतले
PCMC : बाबुरावजी घोलप महाविद्यालयात “मुलाखतीचे तंत्र व देहबोली” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन
- Advertisement -