Saturday, February 8, 2025

CIBIL स्कोअरमुळे मोडलं लग्न ; आर्थिक इतिहास पाहुन वधूपक्षाला धक्का !

Low CIBIL Score Marriage Break : विवाह ठरवताना जुळवाजुळव, कुंडली मिलन, आणि स्थैर्य पाहिले जाते, पण आता आर्थिक स्थैर्य आणि CIBIL स्कोअरही महत्त्वाचा ठरत आहे. असाच एक प्रकार मुर्तिजापूरमध्ये घडला, वराच्या CIBIL स्कोअरमुळे जमलेलं लग्न मोडण्याचा निर्णय वधूच्या कुटुंबाने घेतला. या घटनेमुळे परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

मुर्तिजापूरमधील दोन कुटुंबांत मुला-मुलीच्या लग्नाबाबत चर्चा सुरू होती. दोघांनी एकमेकांना पसंत केल्यानंतर विवाह निश्चित करण्यात आला. मात्र, वर पक्षाच्या घरी झालेल्या चर्चेदरम्यान वधूच्या काकांनी वराचा CIBIL स्कोअर तपासण्याचा आग्रह धरला. यानंतर जो खुलासा झाला, त्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

सिबिल स्कोअरमुळे मोडलं लग्न

CIBIL स्कोअर तपासल्यानंतर मुलाच्या आर्थिक इतिहासाची माहिती समोर आली. त्याने विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जाची माहिती वधूपक्षाला समजली. कमी CIBIL स्कोअरमुळे त्याची आर्थिक स्थिती अस्थिर असल्याचे स्पष्ट झाले. हा धक्का पचवताना वधूपक्षाने गंभीर चर्चा केली आणि अखेर आर्थिक अस्थिरतेचे कारण देत लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.

हा प्रकार समोर आल्यानंतर समाजात आर्थिक स्थैर्य आणि CIBIL स्कोअरच्या महत्त्वावर चर्चा रंगली आहे. विवाह जुळवताना फक्त जात, शिक्षण आणि स्थैर्य पाहण्याऐवजी आर्थिक पार्श्वभूमी तपासण्याची नवीन सुरूवात झाल्याचे बोलले जात आहे.

CIBIL Score म्हणजे काय?

CIBIL (Credit Information Bureau India Limited) स्कोअर हा तुमच्या आर्थिक व्यवहारांवर आधारित असलेला एक तीन अंकी क्रेडिट स्कोअर आहे, जो 300 ते 900 च्या दरम्यान असतो. हा स्कोअर तुमच्या कर्जफेडीच्या सवयी, क्रेडिट कार्ड बिल भरण्याची वेळ, घेतलेल्या कर्जाची रक्कम आणि तुमच्या आर्थिक शिस्तीवर आधारित असतो.

सिबिल स्कोअरचे महत्त्व

उच्च CIBIL स्कोअर (750 ते 900) – बँका आणि वित्तीय संस्थांकडून सहज आणि कमी व्याजदरात कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.
मध्यम CIBIL स्कोअर (600 ते 750) – कर्ज मिळू शकते, पण व्याजदर जास्त लागू शकतो.
कमी CIBIL स्कोअर (300 ते 600) – बँका कर्ज देण्यास नकार देऊ शकतात किंवा कठोर अटी लावू शकतात.

हा स्कोअर बँका, वित्तीय संस्था आणि क्रेडिट कार्ड कंपन्यांना तुमच्या आर्थिक शिस्तीचे मूल्यांकन करण्यासाठी उपयोगी पडतो. जर तुमचा CIBIL स्कोअर चांगला असेल, तर तुम्हाला सहज कर्ज मिळते, तर कमी स्कोअरमुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

धक्कादायक : ब्लूटूथच्या स्फोटामुळे १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

शेतकऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ; जाणून घ्या 10 महत्त्वाच्या घोषणा

इंडिया पोस्टबाबत निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

पुणे हादरलं | आईचे अनैतिक संबंध ; अल्पवयीन मुलाकडून तरूणाची हत्या

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांची मोठी भरती, असा करा अर्ज

Related Articles

- Advertisement -

Latest Articles