Friday, February 7, 2025

Pune : सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ तर्फे पुणे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांचा सन्मान

पुणे (क्रांतीकुमार कडुलकर) – सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे यांच्या वतीने पुणे पोलीस उपायुक्त डॉ संदीप भाजीभाकरे यांचा सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला. (Pune)

गेल्या २६ डिसेंबर रोजी वानवडी परिसरात एक अपघात झाला असता डॉ. संदीप भाजीभाकरे तेथून जात होते, त्यांनी रस्त्यावर पडलेल्या मुलाला फिट आलेले बघून त्याला प्राथमिक उपचार करून सुस्थितीत आणले व त्याचे प्राण वाचवले म्हणून याची दखल घेऊन वर्दीतील डॉक्टर व पुणे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांचा सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांनी सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला.

सदर सन्मान हा दिनांक ४ फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय क्रीडांगणावर करण्यात आला.

अगदी पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police) पदाला गवसणी घातलेले आणि ‘उपळाई बुद्रूक (सोलापूर) अधिकाऱ्यांचे गाव’ म्हणून राज्याला ओळख निर्माण करण्यासाठी मुहूर्तमेढ रोवणारे, सध्या पदोन्नतीने पुण्याचे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ. संदीप रामदास भाजीभाकरे (Dr. Sandeep Bhajibhakare) यांची यशोगाथा (Success Story) प्रेरणादायी अन्‌ अचंबित करून टाकणारी आहे.त्यांची ओळख वर्दीतील डॉक्टर म्हणून अशीही आहे.

मुख्य परीक्षेसाठी कालावधी असल्याने वरकुटे (ता. माढा) येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले. येथे कार्यरत असतानाच दिलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला, आणि पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपअधीक्षक या पदावर त्यांची वर्णी लागली.

सध्या पदोन्नतीने पुण्याचे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. करण्याची जिद्द असेल तर संधी कुठेही उपलब्ध होतात, फक्त करण्याची धमक पाहिजे, असे डॉ. संदीप भाजीभाकरे आवर्जून सांगतात.

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ ही संस्था देश पातळीवर मानव अधिकार साठी काम करत असताना समाजात एक अनोखी बांधिलकी जपत असणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान नेहमीच करत असते तर हा सन्मान केल्याबद्द्ल संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार व पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात व संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

Pune

मानव अधिकारांसाठी काम करताना बऱ्याच वेळा पोलिसांविरुद्ध काम करण्याची वेळ येत असते तर चांगले काम करणारे पोलीस पण भेटत असतात म्हणून अशा प्रकारचे सन्मान करून समाजासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या पोलिसांना प्रोत्साहन देने हे सुद्धा आपले कर्तव्य असल्याचे किशोर थोरात यांनी सांगितले.

ठराविक पोलिसांच्या वृत्तीमुळे समाजाचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत असतो तर डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्यासारख्या मानवतेचे दर्शन घडवणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे पोलीसांची प्रतिमा सुधारण्यात मोलाचा वाटा असतो.

संस्थेच्या वतीने असेच चांगले काम करणाऱ्या खाकितील मानवतेचे सन्मान या पुढेही होत राहतील असे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांनी सांगितले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles