पिंपरी चिंचवड ( क्रांतीकुमार कडुलकर) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबूरावजी घोलप महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक कै बाबूरावजी घोलप साहेब स्मृती सप्ताहानिमित्त वाणिज्य विभाग आयोजित ‘वाणिज्य उद्योजक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. (PCMC)
सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी स्व. राजीव गांधी प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष संदेश नवले, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप, उपप्राचार्या व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. वंदना पिंपळे, कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. अमृता इनामदार आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा प्रमुख हेतू विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कौशल्यांचा विकास व्हावा हा होता. सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक संदेश नवले यांनी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकास व्हावा यासाठी नेतृत्व, संवाद कौशल्य, धोका पत्करण्याची तयारी इत्यादी बाबी अंगीकारणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.
तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ संगीता जगताप यांनी वस्तू /सेवांच्या गुणवत्तेसोबतच नाविन्याचा ध्यास आणि स्पर्धकांचा अभ्यास केल्याशिवाय आपला व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. (PCMC)
वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. वंदना पिंपळे यांनी नवुद्योजक घडण्यासाठी वस्तू / सेवांचा वाजवी दर, वेळेचे व्यवस्थापन, समस्या निराकरण कौशल्य, सांघिक कौशल्य अंगीकारणे आवश्यक आहे असे सांगितले.
या उपक्रमाअंतर्गत वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी इडली चटणी,कोल्ड कॉफी, chat, मोमोस, सँडविच चे वेगवेगळे प्रकार, fried rice, डोसा, चटणी, cake, मेथीचे पराठे, ढोकळा, तसेच मोत्यापासून तयार केलेल्या वस्तू इत्यादी विविध प्रकारचे स्टॉल लावलेले होते.
कार्यक्रमामध्ये पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांना 23 प्रकारचे स्टॉल्स लावलेले असून त्यात 67 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंग महाविद्यालयीन विकास अधिकारी डॉ. अर्जुन डोके, परीक्षा अधिकारी डॉ. नरसिंग गिरी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय घाडगे, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. विद्या पाठारे, वनस्पती शास्त्र विभागातील डॉ. मनीषा शेवाळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वाणिज्य विभागातील डॉ मनीषा त्र्यंबके, प्रा सुषमा सोनार, डॉ. रश्मी भूयान, प्रा अरबाज सय्यद, प्रा प्रवीण खाडे, प्रणित पावले, अवधेश यादव, श्रीमती मालन साळुंके यांनी परिश्रम घेतले.
सदर स्टॉल्सला महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी भेट दिली, विविध पदार्थांचा आस्वाद घेतला आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
PCMC : बाबूरावजी घोलप साहेब स्मृती सप्ताहानिमित्त वाणिज्य विभाग आयोजित वाणिज्य उद्योजक मेळावा
- Advertisement -