पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइनमध्ये, १ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत “वाचन संकल्प महाराष्ट्राचा व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करणे आणि त्यास प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (PCMC)
त्यानिमित्त ग्रंथालयात पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनास विद्यार्थ्यांसह इतर अनेक पालकांनी, वाचकांनी भेट दिली. ग्रंथालयात सामूहिक वाचन सत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
PCMC
मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमात प्रभारी प्राचार्य प्रा. शिल्पा पाटील, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. ग्रंथपाल पूनम सांगळे यांनी ग्रंथालयात दृकश्राव्य माध्यमातून कवी-लेखक ग. दि. माडगूळकर, बा. भ. बोरकर, बहिणाबाई, वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज यांच्या साहित्याविषयी माहिती सांगितली.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
PCMC : एस. बी. पाटील आर्किटेक्चर मध्ये “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा“ साजरा
- Advertisement -