बीजिंग: अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी शनिवारी चीनमधून आयातीवर कठोर टॅक्स लावण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे, त्यानंतर चीन सरकारने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या टॅरिफ निर्णयावर चीनने उत्तर दिले आहे. चीनने म्हटले आहे की, ते अमेरिकेविरुद्ध अनेक उत्पादनांवर प्रत्युत्तर शुल्क लावणार आहेत. तर आम्ही याची गंभीर दखल घेत अमेरिकेला जशास तसे उत्तर द्यायला सुरवात केली आहे. (US-China teriff War)
अमेरिकेच्या टॅरिफ युद्धावर चीनने आपली पावले उचलली आहेत. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केले की, ते अमेरिकेविरुद्ध अनेक उत्पादनांवर प्रत्युत्तर शुल्क लावत आहेत. मंत्रालयाने सांगितले की, ते कोळसा, द्रवीकरण केलेली नैसर्गिक गॅस (LNG) उत्पादनांवर 15 टक्के शुल्क लावणार आहेत.
तसेच, कच्च्या तेलावर, कृषी यंत्रसामग्री आणि मोठ्या कारवर 10 टक्के शुल्क लावले जाईल. याचसोबत चीनने अमेरिकेच्या सर्च इंजिन ‘गूगल’ची चौकशी सुरु केली आहे. तसेच अमेरिकेच्या इतर व्यापारासंबंधी वस्तूवर कठोर उपायांची घोषणा केली आहे.
गूगलकडून तपासणीबद्दल चीनच्या ‘स्टेट अॅडमिनिस्ट्रेशन फॉर मार्केट रेग्युलेशन’ने मंगळवारी सांगितले की, गूगलविरुद्ध विश्वासविरोधी (एंटीट्रस्ट) कायद्यांचे उल्लंघन होण्याच्या संशय घेऊन तपास सुरू केला आहे. तथापि, यामध्ये कोणत्याही शुल्काचा विशेष उल्लेख केला गेला नाही, पण ही घोषणा ट्रंप यांच्या 10 टक्के शुल्क लागू होण्याच्या काही मिनिटांनंतर केली गेली.
US-China teriff War
अमेरिकेने चीनवर 10 टक्के शुल्क लावले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 10 टक्के शुल्क लावले आहे, जे मंगळवारी लागू होईल. तथापि, ट्रंप यांनी काही दिवसांत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे.
‘अमेरिकन व्यापार सुरक्षिततेसाठी टॅरिफ आवश्यक’ असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मेक्सिको, कॅनडा आणि चीनकडून होणाऱ्या आयातीवरील वस्तूंवर कडक शुल्क लावण्याच्या आदेशावर शनिवारी सह्या केल्या होत्या. त्यांनी दावा केला होता की, हे शुल्क अमेरिकन सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.
संयुक्त राष्ट्रात चीनच्या स्थायी प्रतिनिधी काय म्हणाले? US-China teriff War
महत्वाची गोष्ट म्हणजे, संयुक्त राष्ट्रात चीनचे स्थायी प्रतिनिधी फू कांग यांनी शुल्कांविषयी अमेरिकन प्रशासनावर टीका केली आहे. फू कांग यांनी सांगितले की, यामुळे चीनला प्रत्युत्तरात्मक पावले उचलावीत लागतील आणि यामुळे कोणालाही फायदा होणार नाही. कांग यांनी हे देखील म्हटले की, आम्ही अमेरिकेच्या चीन विरोधी नीतीचा निषेध करतो. आम्ही मानतो की, अमेरिका WTO (जागतिक व्यापार संघटना) च्या नियमांचे उल्लंघन करत आहे.
ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको बाबत अशीच भूमिका घेतली होती. या दोन्ही देशांनी पण अमेरिकन वस्तूवर टेरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर ट्रम्प यांनी टेरिफ लावण्याचा निर्णय एक महिना स्थगित केला आहे.